मुंबई : 'झी मराठी'वर नुकत्याच सुरू झालेल्या 'चूकभूल द्यावी घ्यावी' या कार्यक्रमातून अभिनेत्री सुकन्या मोने आणि दिलीप प्रभावळकर ही जोडी भलतीच भाव खावून जाताना दिसतेय.
या कार्यक्रमाचं टायटल साँग नुकतंच प्रसिद्ध करण्यात आलंय. हे गाणंही तितकंच गंमतशीर आहे... अवघ्या काही तासांत हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतंय.
'पिकलं पान जोडुनी हा बांधला हिंदोळा, साठी गेली पाठी तरी वय वर्ष सोळा'... असं म्हणत मनाला अलगद स्पर्श करणारं हे गाणं... त्याच्या किंवा तिच्या साथीने सहजीवनाचे बंध अधिक दृढ करणारं हे गाणं आज प्रेक्षकांची मन जिंकतंय.