मुंबई : प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक प्रभुदेवा त्याचा आगामी चित्रपट
‘एनीबडी कॅन डान्स’च्या सिक्वलमध्ये तो खलनायकाच्या रूपात दिसणार आहे.
कोरिओग्राफर रेमो डिसुजाने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
सिक्वलमध्ये वरुण धवन आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसतील.
सिक्वलमध्ये प्रभुदेवा आणि लॉरेन गॉटलिबही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
चित्रपटाच्या पहिल्या भागातही या दोघांच्या भूमिका होत्या.
या चित्रपटात प्रभुदेवाने एका डान्स गुरूची भूमिका साकारली होती.
यावेळी मात्र तो खलनायकाच्या भूमिकेत दिसेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.