मुंबई: बॉलिवूड अभिनेता विशाल ठक्करवर एका टिव्ही अभिनेत्रीनं बलात्काराचा आरोप केलाय. चारकोप पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र गायकवाड यांनी सांगितलं की, अभिनेता विशाल ठक्कर विरुद्ध बलात्कारासंबंधीत कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलाय.
BollywoodLife.comमध्ये छापून आलेल्या बातमीनुसार, आज सकाळी 9 वाजता आरोपी अभिनेता विशाल ठक्करनं स्वत: पोलीस स्टेशनमध्ये येवून सरेंडर केलंय. विशाल पोलीस स्टेशनला एकटाच आला होता, त्याच्यासोबत कुणीही वकील नव्हता.
आणखी वाचा - बॉलिवूड अभिनेत्यानविरोधात टिव्ही कलाकारावर बलात्काराचा गुन्हा दाखल
विशालनं 'तारक मेहता का उल्टा चश्मा', 'गीत हुई सबसे पराई', 'किस देश में है मेरा दिल' आणि 'क्राइम पेट्रोल' सारख्या अनेक सीरियल्समध्ये काम केलेलं आहे.
पोलिसांनी सांगितलं की, पीडित तरुणीनं टिव्ही सीरियल्समध्ये काम केलेलं आहे आणि तिनं आरोप लावला की, अभिनेत्यानं त्याच्या घरात तिच्यावर बलात्कार केला. विशालनं टँगो चार्ली, मुन्नाभाई एमबीबीएस आणि चांदनी बार सारख्या चित्रपटांमध्येही छोट्या भूमिकेत दिसला.
पाहा कोण आहे विशाल ठक्कर मुन्नाभाईमधील त्याचा रोल पाहा -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.