मुंबई : बालिकावधू फेम अभिनेत्री प्रत्युशा बॅनर्जीच्या संशयास्पद मृत्युने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
बॉयफ्रेण्ड बरोबरच्या तणावामुळेच प्रत्युषाने आत्महत्या केल्याची चर्चा रंगते आहे. दरम्यान श्वास गुदमरून प्रत्युषाचा मृत्यू झाल्याचा शवविच्छेदनाचा अहवाल आलाय. तिच्या पार्थिवावर मुंबईतल्या ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले गेले.
दुसरीकडे प्रत्युषा दोन महिन्यांची गरोदर असल्याचा संशय असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रत्युषाच्या मृत्यूचं गुढ वाढलं आहे.