व्हिडिओ : 'साला खडूस' माधवन!

दक्षिणेचा सुपरस्टार आर. माधवन बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा दिसला तो 'रेहना है तेरे दिल मे' या सिनेमातून... या सिनेमातील त्याची रोमॅन्टिक भूमिकेच्या अनेक तरुणी प्रेमात पडल्या. दिया मिर्झा सोबतचा हा त्याचा चित्रपटही चांगला चालला... आता हाच माधवन एका 'खडूस' व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Updated: Dec 21, 2014, 03:58 PM IST
व्हिडिओ : 'साला खडूस' माधवन!

नवी दिल्ली : दक्षिणेचा सुपरस्टार आर. माधवन बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा दिसला तो 'रेहना है तेरे दिल मे' या सिनेमातून... या सिनेमातील त्याची रोमॅन्टिक भूमिकेच्या अनेक तरुणी प्रेमात पडल्या. दिया मिर्झा सोबतचा हा त्याचा चित्रपटही चांगला चालला... आता हाच माधवन एका 'खडूस' व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. 

'साला खडूस' या आगामी चित्रपटात माधवन एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांसमोर येतोय. या सिनेमाचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. यामध्ये, माधवन एका बॉक्सिंग कोचच्या भूमिकेत दिसतोय. यात तो थोड्या वेगळ्या अवतारात प्रेक्षकांना दिसणार आहे. 

सुधा कोंगरा लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा आगामी वर्षात उन्हाळ्यापर्यंत प्रदर्शित होईल असा अंदाज आहे. 

व्हिडिओ पाहा :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.