बेचैन सलमाननं केला 'जिहाद'चा पुरस्कार!

पाकिस्तानच्या पेशावर दहशतवादी क्रूर हल्ल्यानं अनेकांना हादरवून सोडलंय. इस्लामच्या नावावर तालिबान्यांनी कोवळ्या जीवांवर केलेला अमानुष गोळीबार मुस्लिमच काय तर इतर कोणत्याही धर्मात निषेधार्हच ठरतो. सध्या, मुस्लिम वर्ग ज्या संवेदनांना जगतोय तीच भावना बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान यानं व्यक्त केलाय. 

Updated: Dec 21, 2014, 09:59 AM IST
बेचैन सलमाननं केला 'जिहाद'चा पुरस्कार! title=

मुंबई : पाकिस्तानच्या पेशावर दहशतवादी क्रूर हल्ल्यानं अनेकांना हादरवून सोडलंय. इस्लामच्या नावावर तालिबान्यांनी कोवळ्या जीवांवर केलेला अमानुष गोळीबार मुस्लिमच काय तर इतर कोणत्याही धर्मात निषेधार्हच ठरतो. सध्या, मुस्लिम वर्ग ज्या संवेदनांना जगतोय तीच भावना बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान यानं व्यक्त केलाय. 

सलमाननं 'जिहाद'चा बचाव केलाय. कुराणचा दाखला देत आर्मी शाळेतील लहान मुलांवर केलेला गोळीबार मानवतेचाच खून असल्याचं त्यानं सलमाननं स्पष्ट केलंय. 

या घटनेमुळे बेचैन झालेल्या सलमाननं एकानंतर एक असे अनेक ट्विटस् केलेत... इस्लाममध्ये एका निष्पाप जीवाचा खून म्हणजे पूर्ण मानवतेची हत्या असल्याचंच सलमाननं म्हटलंय. 

'एका निष्पाप जीवाला वाचवणं म्हणजे माणुसकीला वाचवणं आणि एका निष्पापाचा बळी घेणं म्हणजे संपूर्ण मानवतेचाच खून पाडणं' असं ट्विट सलमाननं केलंय. 'युद्धातही कोवळ्या जीवांना, स्त्रियांना, वृद्धांना, धार्मिक स्थळांना आणि शेतीला हानी पोहचवू नये. ज्यांच्या हातानं आणि तोंडानं इतर लोक सुरक्षित नाहीत ते मानव नाहीत... जिहाद म्हणजे संघर्ष... संघर्ष चांगल्या गोष्टींसाठी... सध्या, जिहाद हाच शब्द सर्वात वाईट पद्धतीनं वापरला जातोय. लोकांनी दंग्याला आणि हाणामारील जिहाद बनवून टाकलंय. धर्माच्या नावाखाली इतरांना जीवे मारणाऱ्यांनी अजून त्यांचा धर्मग्रंथही नीट वाचलेला नाहीय' असे ट्विटस सलमाननं एकापाठोपाठ एक टाकलेत. 

नुकत्याच झालेल्या पेशावरमधल्या आर्मी शाळेवर झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी १३२ चिमुरड्यांसहीत १४१ जणांची क्रूर हत्या करण्यात आली.  

पाहा, काय केलेत सलमाननं ट्विटस्... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.