VIDEO : 'मांझी'... एका सामान्य व्यक्तीची असामान्य कथा!

आपल्या अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करणारा नवाझुद्दीन सिद्दीकी आत्ताही काहीतरी नवीन घेऊन आलाय. 

Updated: Jul 14, 2015, 03:27 PM IST
VIDEO : 'मांझी'... एका सामान्य व्यक्तीची असामान्य कथा! title=

मुंबई : आपल्या अभिनयातून नेहमीच प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करणारा नवाझुद्दीन सिद्दीकी आत्ताही काहीतरी नवीन घेऊन आलाय. 

नवाझुद्दीनच्या 'मांझी' या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. या सिनेमात तो खऱ्या अर्थानं डोंगर फोडून आपलं ध्येय गाठणाऱ्या एका 'माऊन्टन मॅन'च्या भूमिकेत दिसतोय. तर त्याच्या प्रेयसीच्या भूमिकेत दिसतेय अभिनेत्री राधिका आपटे... 

'मांझी-अ माऊन्टन मॅन' हा सिनेमा एका व्यक्तीच्या खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारलेली कथा... आणि त्या व्यक्तीचा २२ वर्षांचा प्रदीर्घ काळाचा प्रवास... आपल्या प्रेमासाठी डोंगर फोडून त्यातून मार्ग काढणाऱ्या एका सामान्य माणसाची असामान्य कथा यात चित्रीत करण्यात आलीय. 

२१ ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. 
  
पाहा, याच सिनेमाचा ट्रेलर...  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.