संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’त कलाकार कोण?

 दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमात नक्की कोणते कलाकार असणार यावरुन  अखेर पडदा उठला आहे. दीपिका पदुकोणवर चित्रीत गाण्याने या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. 

Updated: Oct 19, 2016, 10:57 AM IST
संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’त कलाकार कोण?

मुंबई :  दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या ‘पद्मावती’ या सिनेमात नक्की कोणते कलाकार असणार यावरुन  अखेर पडदा उठला आहे. दीपिका पदुकोणवर चित्रीत गाण्याने या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. 

पुढच्या आठवड्यापासून चित्रपटातील ‘घूमर..’ या गाण्याच्या चित्रिकरणाला सुरुवात केली जाईल.  ‘पद्मावती’ चित्रपटातील चित्रित होणाऱ्या या गाण्यामध्ये दीपिकाचा राजस्थानी नाच तिच्या चाहत्यांना बघायला मिळणार आहे. या सिनेमात शाहिद कपूर आणि रणवीर सिंह यांच्याही प्रमुख भूमिका असणार आहेत.