राजनैतिक, धार्मिक मुद्द्यांवर बोलण्यास शाहरुखची तौबा!

'असहिष्णुते'च्या मुद्द्यावर वक्तव्य करून वादात अडकलेल्या शाहरुखनं आता राजनैतिक आणि धार्मिक मुद्द्यांवर न बोलण्याचा निर्धार केलाय. 

Updated: Jan 12, 2016, 11:29 AM IST
राजनैतिक, धार्मिक मुद्द्यांवर बोलण्यास शाहरुखची तौबा!

कोलकाता : 'असहिष्णुते'च्या मुद्द्यावर वक्तव्य करून वादात अडकलेल्या शाहरुखनं आता राजनैतिक आणि धार्मिक मुद्द्यांवर न बोलण्याचा निर्धार केलाय. 

या विषयांसंबंधित कोणत्याही प्रश्नाचं उत्तर यापुढे आपण देणार नसल्याचं बॉलिवूडचा किंग खान म्हणतोय. 

नुकत्याच एका पत्रकार परिषदेत मुंबईत पाकिस्तान गझल गायक गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द होण्यासंदर्भातील एका प्रश्नावर उत्तर देताना, 'कोणत्याही राजनैतिक किंवा धार्मिक प्रकरणांतील मुद्यांवर मला ज्या काही प्रतिक्रिया मिळतात त्यामुळे मला असं वाटत नाहीए की मी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत'

यापूर्वी शाहरुखनं भारतात असहिष्णुता असल्याचं म्हटलं होतं. यावर वाद उभा राहिल्यानंतर त्यानं माफिही मागितली होती. या वादांमुळे आपल्या 'दिलवाले' या सिनेमाच्या कमाईवरही परिणाम झाल्याचं त्यानं म्हटलं होतं. 

उल्लेखनीय म्हणजे, गुलाम अली मंगळवारी कोलकातामध्ये एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.