अभिनेता नाना पाटेकरांच्या रडारावर झाकीर नाईक, सलमान खान

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी द बॉम्बे आर्ट सोसायटीमध्ये आयोजित द पोट्रेट शोमध्ये सहभागी होउन आपल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचवेळी त्यांनी झाकीर नाईक, सलमान खान यांना जोरदार टोला लगावला.

Updated: Jul 15, 2016, 10:42 PM IST
अभिनेता नाना पाटेकरांच्या रडारावर झाकीर नाईक, सलमान खान title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी द बॉम्बे आर्ट सोसायटीमध्ये आयोजित द पोट्रेट शोमध्ये सहभागी होउन आपल्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याचवेळी त्यांनी झाकीर नाईक, सलमान खान यांना जोरदार टोला लगावला.

ख्यातनाम चित्रकार वासुदेव कामत यांनी नानाचे लाईव्ह पोट्रेट काढून रसिकांना मंत्रमुग्ध केलं.. या वेळी नाना पाटेकर यांनी समाजातल्या अनेक मुद्यांवरही हात घातला.. पैसे घेऊन समाजाचं काम करणाऱ्या आमच्या सारख्या अभिनेत्या आणि खेळाडूंना भारतरत्न देण्यापेक्षा समाजासाठी निस्पृह काम करणाऱ्या बाबा आमटेंसारख्या तपस्वींना हा सन्मान द्यावा असंही नाना पाटेकर यावेळी म्हणाले. 

नाना पाटेकर यांनी डॉ झाकीर नाईकपासून अभिनेता सलमान खानपर्यंत सगळ्याच विषयांवर आपली मते मांडली. पाहा काय म्हणालेत ते...