विद्या बालननंतर आता झरीन खानलाही डेंग्यू

विद्या बालननंतर आता झरीन खानलाही डेंग्यूची लागण झाली आहे. 

Updated: Sep 23, 2016, 04:54 PM IST
विद्या बालननंतर आता झरीन खानलाही डेंग्यू

मुंबई : विद्या बालननंतर आता झरीन खानलाही डेंग्यूची लागण झाली आहे. सोमवारी पुण्याहून मुंबईला येत असताना झरीनला ताप आला. यानंतर लीलावती रुग्णालयात तिची डेंग्यूची तपासणी झाली. मंगळवारी या चाचणीचा अहवाल आल्यानंतर झरीनला डेंग्यू असल्याचं निदान झालं.

झरीन ही सध्या रुग्णालयात दाखल आहे. डेंग्यूमुळे झरीनला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत शूटिंगला हजेरी लावता येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अक्सर-2 या चित्रपटामध्ये झरीन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या सुरू आहे.