झी मराठी अवॉर्ड : 'दिल दोस्ती दुनियादारी'चं कुटुंब ठरलं सर्वोत्कृष्ट कुंटुंब!

'झी मराठी अवॉर्ड 2015' सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडलाय. यामध्ये, प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या मतांच्या आधारे अनेक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी, सर्वसाधारण कुटुंबाच्या चौकटीत न बसणारं 'दिल दोस्ती दुनियादारी'चं कुटुंब यंदाचं 'सर्वोत्कृष्ट कुटुंब' ठरलं... तर तब्बल नऊ पुरस्कार आपल्या नावावर करत 'का रे दुरावा' या कार्यक्रमानं यंदा बाजी मारलीय. 

Updated: Oct 16, 2015, 08:00 PM IST
झी मराठी अवॉर्ड : 'दिल दोस्ती दुनियादारी'चं कुटुंब ठरलं सर्वोत्कृष्ट कुंटुंब! title=

मुंबई : 'झी मराठी अवॉर्ड 2015' सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडलाय. यामध्ये, प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या मतांच्या आधारे अनेक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी, सर्वसाधारण कुटुंबाच्या चौकटीत न बसणारं 'दिल दोस्ती दुनियादारी'चं कुटुंब यंदाचं 'सर्वोत्कृष्ट कुटुंब' ठरलं... तर तब्बल नऊ पुरस्कार आपल्या नावावर करत 'का रे दुरावा' या कार्यक्रमानं यंदा बाजी मारलीय. 

का रे दुरावा, जय मल्हार, नांदा सौख्य भरे, होणार सून मी ह्या घरची, अस्मिता आणि दिल दोस्ती दुनियादारी अशा सहा मालिका यंदा स्पर्धेत होत्या.

या सर्वांत बाजी मारत ‘का रे दुरावा’ मालिकेने यंदाचा सर्वोत्कृष्ट मालिकेचा बहुमान मिळवला. तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रमाचा मान ‘चला हवा येऊ द्या’ने मिळवला.


काही धम्माल परफॉर्मन्स

सर्वोत्कृष्ट नायक - खंडोबा (जय मल्हार) 

सर्वोत्कृष्ट नायिका - म्हाळसा आणि बानू (जय मल्हार) 

सर्वोत्कृष्ट कुटुंब - दिल दोस्ती दुनियादारी 

सर्वोत्कृष्ट मालिका - का रे दुरावा 

सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम - चला हवा येऊ द्या 

कार्यक्रमाला खरी रंगत आणली ती कलाकारांच्या धम्माल परफॉर्मन्सेसनं... 'झी मराठी अवॉर्ड'चा हा भव्य सोहळा येत्या 1 नोव्हेंबरला सायंकाळी 7.00 वाजता 'झी मराठी'वरून प्रेक्षकांना बघता येणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.