मुंबई : 'बिग बॉस'चा होस्ट सलमान खान आता या कार्यक्रमातून बाहेर पडणार आहे. सलमानच्या जागी आता होस्ट म्हणून फराह खान दिसणार आहे.
त्याचं झालं असं की, 'बिग बॉस-८'च्या निर्मात्यांना एका महिन्यानं हा शो आणखी वाढवायचाय... नियोजित वेळेनुसार हा कार्यक्रम ४ जानेवारी २०१५ रोजी संपणार होता. पण, या कार्यक्रमाची लोकप्रियता इतकी वाढलीय की हाच कार्यक्रम आणकी एक महिन्यानं वाढवण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमाननं या कार्यक्रमासाठी केवळ ४ जानेवारीपर्यंतच वेळ दिला होता... त्यानंतर तो आपल्या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त होणार आहे. लवकरच त्याच्या 'बजरंगी भाईजान' आणि 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमांची शूटींग सुरु होणार आहेत. त्यामुळे, बिग बॉसचे निर्माते नवीन होस्ट शोधायला लागेल होते. त्यांना एक अशी व्यक्ती हवी होती जी सलमानची जागा घेऊ शकेल.
मिळालेल्या माहितीनुसार, आता 'बिग बॉस'च्या निर्मात्यांचा हा शोध दिग्दर्शिका - अभिनेत्री फराह खान हिच्या नावावर येऊन थांबलाय. फराहनं आपण 'बीग बॉस' या कार्यक्रमाचे चाहते असल्याचं अगोदरच सांगितलंय.
फराहच्या अगोदर निर्मात्यांनी करण जोहर आणि अनिल कपूर यांच्याशीही संपर्क केला होता... पण, बात कुछ बनीं नही...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.