आमीर खान आणि राज ठाकरे यांच्यातील साम्य

मिस्टर परफेक्ट आमीर खान आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात विविध गोष्टीत साम्य दिसून आलं आहे.

Updated: Oct 3, 2014, 01:57 PM IST
आमीर खान आणि राज ठाकरे यांच्यातील साम्य title=

मुंबई : मिस्टर परफेक्ट आमीर खान आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात विविध गोष्टीत साम्य दिसून आलं आहे.

आमीर खानचा सत्यमेव जयते हा कार्यक्रम 5 ऑक्टोबर रोजी प्रसारीत होणार आहे. यासाठी आमीर खानने ‘मुमकीन है’ अशी टॅगलाईन ठेवलीय. 

राज ठाकरे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, 15 तारखेला मतदान होणार आहे. राज  ठाकरे यांनीही, ‘हो हे शक्य आहे’, अशी टॅग लाईन सध्या घेतलीय.

आमीर खान आणि राज ठाकरे यांचा सौदर्याविषयी असलेला दृष्टीकोनही एकच दिसून येतो.

परफेक्शनिस्ट
आमीर खानला सर्वच गोष्टीत परफेक्शन हवं असतं, ते तो करून घेतल्याशिवाय शांत बसत नाही.

तसेच राज ठाकरे यांनाही परफेक्शन आठवडतं, अगदी प्रचार सभेचं स्टेज कसं असेल, मागे काय बॅनर असेल, त्यातल्या त्यात साऊंड सिस्टम ही उत्कृष्ट असावी, नाही तर राज अस्वस्थ होतात.

सिनेमा आणि राजकारण
मी राजकारणात राहिलो नसतो, तर सिनेमा काढला असता, असं राज ठाकरे म्हणतात, सध्या आमीर खान सिने इंडस्ट्रीत आहे, पण मध्ये मध्ये त्यालाही सामाजिक कार्य़ाचे झटके येतात, एकदा आमीर खाननेही नर्मदा बचाव आंदोलनाला पाठिंबा देत आंदोलनात भाग घेतला होता. तसेच अण्णा हजारे यांच्या आंदोलनाही पाठिंबा दिला होता.  सत्यमेव जयते हा कार्यक्रम देखील सामाजिक प्रश्नावर अवलंबून आहे.

हटके प्रमोशन
आमीरला आपल्या चित्रपटाचं प्रमोशन जरा हटके आणि योजनाबद्ध पद्धतीने राबवायला आवडतं. राज ठाकरे हे देखिल आपल्या पक्षाचं झेंड्यापासून बॅनरपर्यंत, ते  माहिती पत्रकं असून देत, नाहीतर लघुपट हे व्यवस्थित योजना आखून प्रमोट करायला आवडतं.

आमीर खान आणि राज ठाकरे यांच्या सर्वच गोष्टी आवडी-निवडी जुळत नसतील. मात्र त्यांचा सामाजिक विकासाचा दृष्टीकोन, परफेक्शन आणि कलेचं सौंदर्य, जतन आणि आवड हे गुण मात्र जुळून येतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.