दमदार ब्लू प्रिंटनंतर, आता मनसेचं प्रचारगीत प्रसिद्ध

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं खास प्रचारगीत तयार केलंय. या प्रचारगीताचं अनावरण आज शर्मिला ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे आदींच्या उपस्थितीत कोहिनूर हॉटेलमध्ये झालं.

Updated: Oct 2, 2014, 07:58 PM IST
दमदार ब्लू प्रिंटनंतर, आता मनसेचं प्रचारगीत प्रसिद्ध title=

मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं खास प्रचारगीत तयार केलंय. या प्रचारगीताचं अनावरण आज शर्मिला ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिशिर शिंदे आदींच्या उपस्थितीत कोहिनूर हॉटेलमध्ये झालं.

ख्यातगाम संगीतकार अजय-अतुल यांनी हे प्रचारगीत तयार केलंय. दरम्यान, प्रदेश भाजपच्या नेत्यांना आत्मविश्वास नसल्यानं ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रचारासाठी आणतायत, अशी टीका बाळा नांदगावकर यांनी यावेळी केली.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.