निवडणूक : ११,०६,७२,६४० रुपये आणि दारू-गांजा जप्त

निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना राज्यात पैसे आणि दारुचा महापूर आलाय. आत्तापर्यंत निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत ११ कोटी ६ लाख ७२ हजार ६४० रुपये जप्त केलेत. तसंच अनेक ठिकाणी अवैध दारू आणि गांजाही पकडला गेलाय. 

Updated: Oct 13, 2014, 01:28 PM IST
निवडणूक : ११,०६,७२,६४० रुपये आणि दारू-गांजा जप्त title=

नागपूर : निवडणुकींचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना राज्यात पैसे आणि दारुचा महापूर आलाय. आत्तापर्यंत निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत ११ कोटी ६ लाख ७२ हजार ६४० रुपये जप्त केलेत. तसंच अनेक ठिकाणी अवैध दारू आणि गांजाही पकडला गेलाय. 

दरम्यान, नागपुरात गेल्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने दोन विविध घटनांत ८० लाख रुपये जप्त केले असताना, ६ लाख रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली आहे. नागपूरच्या लकडगंज पोलिसांच्या हद्दीत क्वेटा कॉलोनी जवळ ही घटना घडलीय.

पोलिसांनी विदेशी मद्याच्या तब्बल साडे चौदा हजार बाटल्या जप्त केल्या आहेत. एका मिनी-ट्रकमध्ये दारूचे ९८ खोके नेले जात असताना, चौकशीत हा प्रकार उघडकीस आला. तर नवी मुंबई पोलिसांनी गेल्या २४ तासात वेगवेगळ्या प्रकरणात एकूण ३ लाख ६८ हजार रुपयांची रोकड़ जप्त केली आहे. या प्रकरणी दोघा जणांना अटक केली आहे.
दुसरीकडे, खारघर पोलिसांनी २ लाख ५० हजार रुपयांची रोकड़ जप्त केली. ठाकुर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या स्कोर्पियो गाडीत ही रोकड सापडली तर पनवेल पोलिसांनी एक लाख तीन हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. प्रकाश कामरे आणि रोहीत यादव हे दोघे जण पाकिटात हजार रूपये घालून वाटत होते... अशी तब्बल १०४ पैशांनी भरलेली पाकीटं पोलिसांनी जप्त केलीत. 

कारवाईत आत्तापर्यंत काय काय पकडलंय... टाकुयात एक नजर...
* निवडणूक आयोगाकडून कोट्यवधी रुपये जप्त केलेत... 
* आतापर्यंत ११ कोटी ६ लाख ७२ हजार ६४० रुपये जप्त
* २ लाख ७२ हजार ७०७ लीटर अवैध दारू जप्त
* २ कोटी ३ लाख ४६ हजारांचा गांजा, अमली पदार्थ जप्त
* आचारसंहिता भंगाची ७०९ प्रकरणे, ६०४ प्रकरणात एफआयआर

महत्त्वाच म्हणजे, इन्कम टॅक्स खात्याच्या कारवाईचा आकडा अद्यापही स्पष्ट करण्यात आलेला नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.