शिवसेनेचा प्रस्ताव भाजपनं फेटाळला

राज्यात सरकार स्थापनेसाठी भाजपकडून बहुमताची जुळवाजुळव सुरू झालीय. शिवसेनेकडून भाजपला गेलेला प्रस्ताव भाजपनं फेटाळला आहे. 

Updated: Oct 20, 2014, 10:36 PM IST
शिवसेनेचा प्रस्ताव भाजपनं फेटाळला title=

मुंबई: राज्यात सरकार स्थापनेसाठी भाजपकडून बहुमताची जुळवाजुळव सुरू झालीय. शिवसेनेकडून भाजपला गेलेला प्रस्ताव भाजपनं फेटाळला आहे. 

शिवसेनेनं सरकारमधील निम्मे खाते आपल्याला मिळावेत. १९९५च्या युती सरकारमधील फॉर्म्युलाप्रमाणे खातेवाटप करण्याचा प्रस्ताव शिवसेनेनं दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय. शिवसेनेचा हाच प्रस्ताव भाजपनं फेटाळल्याचं कळतंय.

निवडणुकीत भाजपला १२२ तर शिवसेनेला ६३ जागा मिळाल्या आहेत. स्पष्ट बहुमत नसल्यानं आता शिवसेना-भाजप पुन्हा होणार का? की राष्ट्रवादीनं बाहेरून दिलेलं समर्थन भाजप स्वीकारणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.