देवेंद्र मुख्यमंत्री झाल्यानंतरही बँकेतच नोकरी करणार अमृता फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ३१ ऑक्टोबरला शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आपली अॅक्सिस बँकेतील नोकरी कायम ठेवणार आहे. नागपूरहून त्या मुंबईला ट्रान्सफर मागणार आहेत.

Updated: Oct 29, 2014, 06:20 PM IST
देवेंद्र मुख्यमंत्री झाल्यानंतरही बँकेतच नोकरी करणार अमृता फडणवीस title=

नागपूर: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ३१ ऑक्टोबरला शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस आपली अॅक्सिस बँकेतील नोकरी कायम ठेवणार आहे. नागपूरहून त्या मुंबईला ट्रान्सफर मागणार आहेत.

अमृता अॅक्सिस बँकेत असोसिएट वाइस-प्रेसिडंट आहे आणि नागपूरच्या प्रिमियम ब्रांचच्या हेड आहेत. अमृता यांनी सांगितलं की, त्यांचे पती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना आणि अमृता या दोघांनाही त्यांनी आपली बँकेतील नोकरी कायम ठेवावी असं वाटतं. एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीवरून त्या म्हणाल्या, “मी माझी नोकरी सोडणार नाही. इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत केलीय आणि मला असं वाटतं प्रत्येक महिलेनं आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न करावा. मी नेहमी काम करत राहणार कारण बौद्धिक विकासही आवश्यक आहे. ही नोकरी माझ्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे.”

अमृता यांनी सांगितलं की, मुंबईमध्ये ट्रांसफर मिळाली नाही तर मी सध्या काम करत असलेल्या ब्रांचमध्येच काम सुरू ठेवील, सोबतच फडणवीस यांच्या विधानसभा क्षेत्राकडे लक्षही देईल. अमृताचे आई-वडील नागपूर इथं डॉक्टर आहेत. २००६मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अमृता यांचा विवाह झाला. त्यांना पाच वर्षांची एक गोंडस मुलगीही आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्य़ानंतर फडणवीस मागील अनेक काळापासून निवडणूक प्रचारात व्यस्त असल्यामुळं मागील अनेक काळापासून ते आपल्या कुटुंबाला खूप कमी वेळ देऊ शकलेत. अमृता यांनी याबद्दल सांगितलं, “माझी मुलगी आणि मी आम्ही खूप वेळेआधीच समजलो होतो की, देवेंद्र यांचं आयुष्य समाजातील लोकांसाठी आहे. त्यामुळं आम्ही त्यांच्याकडे जास्त वेळेची मागणी करत नाही.”

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.