मुंबई : मी दिल्लीमध्ये खूश आहे, पण पक्ष श्रेष्ठींनी निर्णय घेतील तो मान्य असेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुतोवाच करून आपण मुख्यमंत्री होण्यास तयार आहे असे स्पष्ट संकेत दिले आहे.
यापूर्वी आपण दिल्लीत आनंदी आहोत. महाराष्ट्रात येण्याची शक्यता नसल्याचे वारंवार गडकरी यांनी सांगितले होते. पण आज त्यांनी पक्ष श्रेष्ठींच्या कोर्टात चेंडू टाकून आपल्या मुख्यमंत्रीपदाची दावेदारी स्पष्ट केली आहे.
शिवसेनेने पाठिंबा दिला तर आनंद होईल, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रात भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल मिळाल्यानंतर प्रथमच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राज्यात परतले आहेत. त्यांचे नागपूर विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं.
विदर्भात भाजपनं ऐतिहासिक यश मिळवलंय. त्यामुळं त्यांनी विदर्भातल्या जनतेचे आभार मानले.
गडकरी यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी, असे सूचक विधान भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी केले होते. त्याला अनुमोदन देत भाजपच्या विदर्भातील ४० आमदारांनी गडकरींच्या घराबाहेर शक्तीप्रदर्शन केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.