निवडणुकीची माहिती मोबाईल अॅपवर

तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? मतदान केंद्र कुठलं. ही सगळी माहिती आता मोबाईलच्या अॅपमध्ये उपलब्ध झाली आहे.

Updated: Oct 14, 2014, 05:35 PM IST
निवडणुकीची माहिती मोबाईल अॅपवर title=

नाशिक : तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? मतदान केंद्र कुठलं. ही सगळी माहिती आता मोबाईलच्या अॅपमध्ये उपलब्ध झाली आहे.
 
सोशल मीडियाबरोबर एक पाऊल पुढे टाकत नाशिकच्या श्रीकांत निंबाळकर या तरुणानं ‘मतदार यादी’ नावाचं अॅप्लिकेशन तयार केलंय. लोकसभा निवडणुकीत मतदानाची आकडेवारी जरी वाढली असली तरी मतदानाच्या दिवशी उद्भवलेल्या गोंधळामुळे लाखो मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावं लागलं होतं. हेच टाळण्यासाठी हे नवं अॅप तयार करण्यात आलंय.

स्वतःचं नाव आणि जिल्हा या अॅपमध्ये टाकला की तुमचं मतदान केंद्र, मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही, केंद्र क्रमांक, अशी सगळी माहिती मिळते. 
 
मतदानाला जाताना काय कागदपत्रं न्यावीत, यासह इतर माहितीही या अॅपमध्ये देण्यात आलीय. मतदान करण्यासाठी अवघा महाराष्ट्र सज्ज झालाय. तुम्हीही मतदान करा. पण त्याआधी आपलं नाव मतदार याधीत आहे की नाही, याची खात्री या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून नक्की करुन घ्या. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.