हे मुद्दे भाजपसाठी महाराष्ट्रात डोकेदुखीचे ठरू शकतात

केंद्रात यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याची अपेक्षा असलेल्या भाजपला काही महत्वाचे मुद्दे डोकेदुखी ठरू शकतात, किंबहुना भाजप नेत्यांनाही या मुद्यांची कुणकुण कार्यकर्त्यांकडून लागली असावी.

Updated: Oct 6, 2014, 09:25 AM IST
 हे मुद्दे भाजपसाठी महाराष्ट्रात डोकेदुखीचे ठरू शकतात title=

मुंबई : केंद्रात यश मिळाल्यानंतर महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्याची अपेक्षा असलेल्या भाजपला काही महत्वाचे मुद्दे डोकेदुखी ठरू शकतात, किंबहुना भाजप नेत्यांनाही या मुद्यांची कुणकुण कार्यकर्त्यांकडून लागली असावी.

१) भाजप आणि शिवसेनेने मिळून लोकसभा लढवली असली तरी, विधानसभेत भाजप आणि शिवसेना हे स्वतंत्रपणे लढत आहेत. शिवसेनेचा विरोधकांपेक्षा एकेकाळचा मित्र भाजपवर राग अधिक दिसून येतोय.

२) युती तुटल्यानंतर मुंबई, उपनगर, कोकण, पुणे, नाशिक आणि औरंगाबादेत शिवसैनिकांचा राग एकेकाळचा मित्र पक्ष भाजपवर वाढत चालला आहे.

३) सर्वात महत्वाचे मुद्दा मुंबई आणि महाराष्ट्रातील काही कार्यालयं बाहेर हलवण्याची केंद्राची घाई ही भाजपला सत्तेपासून दूर नेणारी ठरू शकते, पहिल्या टप्प्यात या सांगीवांगीच्या गोष्टी वाटत असल्या, तरी ही यादी वाढतच चालली आहे. 

४) भाजपच्या राज्यातील मोठ्या नेत्यांनी, लगीनघाई केल्यासारखं गुडघ्याला बाशिंगबांधून विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळा करण्याची भूमिका जाहीरपणे बोलून दाखवली, यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आणि नुकतीच स्वतंत्र तेलंगणासाठीची उग्र आंदोलनं आणि त्यांच्या परिणामांचा विचार केला नाही.

५) युती तुटली आणि मुंबईतून महत्वाची कार्यालय हलवण्याची चर्चा सुरू झाली, त्यानंतर अमित शहांसारखा गुजराथी चेहरा जाहीर प्रचार सभांमध्ये आल्यानंतर, केंद्राची महाराष्ट्रविरोधी भूमिका आहे, असं रंगवण्यात विरोधकांना मदत झाली. महाराष्ट्रात नेते नाहीत का असा सवालही कार्यकर्त्यांमधूनच समोर येऊ लागला.

५) कांद्याने अनेक सरकारं घालवली आहेत. दिल्लीत एकदा कांद्यांचे भाव वाढल्याने सुषमा स्वराज यांना लोकांनी नाकारलं होतं. यावेळीही मोदी सरकारने गंभीरता ओळखून कांद्याची निर्यात बंदी लावली असावी, मात्र कांदा आयातीची गरज होती का?, याचाही विचार गंभीरपणे करायला हवा होता.

कांद्यांचे भाव गडगडल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत, त्यातचं डाळींबाचे भाव थोडे खाली आल्याने सरकारविषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढलीय.

६) कापसाचं इतर कापूस उत्पादक देशांमध्ये विक्रमी उत्पादन झालंय, भारतात मे ते जून महिन्याची लागवड सोडली तर अजून शेतकऱ्यांच्या घरात अजून कापूस आलेला नाही. मात्र आगाऊ लागवड करणाऱ्यांनी भाव गडगडल्याने डोळे वटारले आहेत. मागील वर्षी प्रतिक्विंटल ४ हजार ५०० जाणारा कापूस या वर्षी ३५०० ते ३६०० रूपये क्विंटलवर घसरला आहे.

७) एका रात्रीत भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदार-उमेदवारांची संख्या मोठी आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीत ३६ ते ४० उमेदवार दोन दिवसांपूर्वी विरोधी पक्षात होते, या आमदारांना भाजपच्या तिकीटावर किती यश मिळेल हे सांगता येत नाही, कारण वर्षानुवर्षे काम करणारे भाजपचे स्थानिक कार्यकर्ते मात्र नाराज झाले. सत्ताधारींपक्षातील आमदार आपल्या पक्षात घेऊन सत्ताविरोधी लाट आपल्या पक्षावर ओढवून घेण्यासारखं असल्याचं सांगण्यात येत आहे.

८) राज्यात लोकांना जनसामान्यांना अपिल करेल असा कोणताही चेहरा सध्या भाजपमध्ये नाही, म्हणून भाजपातल्या सामान्यातल्या सामन्य कार्यकर्त्याला गोपीनाथ मुंडेंची यावेळी आठवण होतेय. ग्रामीण भागातलं नेतृत्व भाजपात हरवल्यासारखं वाटतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.