स्वतंत्र विदर्भाला मनसेचा विरोधच – राज ठाकरे

 वेगळ्या विदर्भाची मागणी ही काही व्यक्तींच्या राजकीय सत्तासुखासाठीची आहे. जिजाऊचा जन्म विदर्भाच्या मातीतला. त्यामुळं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला तोडण्याचे पाप कदापीही करू देणार नाही, अशी गर्जना राज ठाकरे यांनी केलीय. 

Updated: Oct 1, 2014, 06:25 PM IST
स्वतंत्र विदर्भाला मनसेचा विरोधच – राज ठाकरे title=

अमरावती:  वेगळ्या विदर्भाची मागणी ही काही व्यक्तींच्या राजकीय सत्तासुखासाठीची आहे. जिजाऊचा जन्म विदर्भाच्या मातीतला. त्यामुळं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला तोडण्याचे पाप कदापीही करू देणार नाही, अशी गर्जना राज ठाकरे यांनी केलीय. 

पोलीस भरतीत उमेदवारांची उंची मोजली जाते. राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांची उंची केव्हा मोजणार, अशी उपहासात्मक टीका राज ठाकरे यांनी वलगाव इथं मंगळवारी जाहीर सभेत केली. 
राज्यभरातील सुरक्षा रक्षकांच्या कंपन्या या परप्रांतियांच्या हाती असून, मनसेला जनतेनं बहुमताचा कौल दिल्यास राज्यात एकही परप्रांतीय सुरक्षा रक्षक दिसणार नाही, अशी त्यांनी ग्वाही दिलीय.

आघाडी, महायुतीचा जागा वाटपाचा मुद्दा म्हणजे नंगा नाच होय, असं सांगत राज यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या चारही पक्षांना सामान्य जनतेचे काहीही घेणे देणे नाही. या पक्षांच्या नेत्यांचे एकमेकांशी हितसंबंध असून एकाने मारल्यासारखे करायते, तर दुसऱ्यानं रडल्यासारखे वागायचे असा जनतेला फसवणुकीचा फंडा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात सत्ताधारी, विरोधक एकत्र आल्यामुळं सिंचन घोटाळा, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी वाढली असून, या आघाडी सरकारमुळं महाराष्ट्राचे वाटोळे झाल्याचा घणाघात राज यांनी केला. 

राज्यात सिंचनात ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असतांना अजित पवार धरणात पाणी नाही तर असभ्य भाषेचा वापर करतात. यांना जनता कधी धडा शिकवणार, असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.