नवी दिल्ली : मनोहर लाल खट्टर हे हरियाणात भाजपाचे पहिले मुख्यमंत्री असतील, खट्टर हे पंजाबी आहेत. पंजाबी समाजातील ते हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री आहेत.
खट्टर यांच्याशी संबंधित आठ महत्वाचे मुद्दे
1. साठ वर्षांचे मोहनलाल खट्टर पहिल्यांदा आमदार झाले आणि पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत.
2. मोहनलाल खट्टर ३५ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. ते १९७७ मध्ये आरएसएसशी जोडले गेले तेव्हा ते २४ वर्षांचे होते. मागील २० वर्षांपासून ते भाजपात सक्रिय आहेत.
3. मनोहर लाल खट्टर मूळचे पंजाबी आहेत. राज्यात पहिल्यांदा या समाजाचा मुख्यमंत्री होत आहे.
4. मनोहर लाल खट्टर यांचे वडिल १९४७ मध्ये पाकिस्तानहून रोहतक जिल्ह्यातील निदाना गावात आले, जेथे खट्टर यांचा जन्म १९५४ मध्ये झाला, यानंतर त्यांचं परिवार बनियानी गावात शेती करत होतं, आणि तिथेच ते परिवार वसलं.
5. मनोहर लाल खट्टर दहावी पास झाल्यानंतर दिल्लीतील सदर बाजारात दुकान चालवत होते, सोबत त्यांनी दिल्ली विद्यापिठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.
6. आरएसएसचं काम त्यांनी आयुष्यात महत्वाचं मानलं आणि त्यांनी लग्न केलं नाही, संघ प्रचारक म्हणून त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम केलं, एका खोलीत ते मोदींबरोबर काही दिवस राहिले देखिल आहेत. ही जवळीक लक्षात घेऊन खट्टर यांनी निवडणूक लढवली होती.
7. रोहतकच्या बदल्यात करनालमधून निवडणूक लढवण्यास खट्टर यांना विरोध झाला, मात्र खट्टर आरामात विजयी झाले.करनालमधून ते ६३ हजार ७७३ मतांनी निवडून आले.
8. मनोहरलाल खट्टर यांना प्रशासन सांभाळण्याचा शून्य अनुभव आहे, मात्र आरएसएस त्यांची खरी ताकत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.