दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय

विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय झालेत. राज ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय. निवडणुकीनंतर पुन्हा सक्रिय झालेल्या राज ठाकरेंनी थेट शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घातलाय. 

Updated: Oct 29, 2014, 09:49 PM IST
दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय  title=

मुंबई: विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय झालेत. राज ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय. निवडणुकीनंतर पुन्हा सक्रिय झालेल्या राज ठाकरेंनी थेट शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घातलाय. 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ३००० रुपये दर मिळावा, पहिला हप्ता अडीच हजार रुपयांचा मिळावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. 
 

वाचा काय आहे निवेदनात

राज ठाकरे यांनी ऊस दराबाबत राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांना निवेदन दिलं आहे. या निवेदनात, “ महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने सुरु झाले आहेत. मात्र ऊसाचा पहिला हप्ता आणि अंतिम दर अद्याप जाहीर झालेला नाही. कारखाने झपाट्यानं ऊस तोडून नेत आहेत. त्यामुळं शेतकरी कोंडीत सापडला आहे. बी-बियाणं, खतं यांचं वाढते दर पाहाता ऊसाला पहिली उचल २५०० रुपये तर अंतिम दर तीन हजार रुपये द्यावा. यासाठी राज्यपालांनी स्वत: लक्ष घालून दर जाहीर करावेत” असं म्हटलं आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.