मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येणार का, याची चर्चा असताना राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दोघे भाऊ एकत्र येतील असे संकेत दिलेत. विधानसभा निवडणुकीनंतर राज आणि उद्धव ठाकरे नक्कीच येऊ शकतात, असा विश्वास शर्मिला यांनी व्यक्त केलाय.
ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्र एकहाती जिंकता येईल. दुसऱ्या कोणत्याही पक्षांना मतदान होणार नाही, असा विश्वास शर्मिला यांनी व्यक्त करताना निवडणुकीच्या आधीच राज-उद्धव एकत्र यायला हवे होते, असं मतही त्यांनी व्यक्त केले.
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही अशाच प्रकारचे संकेत दिले आहेत. आम्ही स्वबळावर लढत आहोत. सत्तेवर आल्यावर जो कुणी महाराष्ट्राच्या विकासासाठी सोबत येईल, त्यांना आम्ही सोबत घेऊन सन्मान देऊ, असं आदित्य म्हणाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.