मुंबई : चक्क दोन चकमक फेम एन्काऊंटर स्पेशालिस्ट विधानसभा निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांना रामदास आठवलेंच्या रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडियाने पाठिंबा दिला आहे.
चकमक फेम प्रदीप शर्मा आणि रवींद्र आंग्रे यांना ‘रिपाइं’नं पाठिंबा दिला आहे.‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ पुरस्कृत उमेदवार म्हणून प्रदीप शर्मा यांनी अंधेरी पूर्व या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलाय तर रवींद्र आंग्रे यांनी विक्रोळीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.