दूरदर्शनवर सरसंघचालकांचं भाषण का दाखवलं गेलं?

आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीनिमित्त केलेलं भाषण दूरदर्शनवर लाईव्ह प्रसारित करण्यात आलं. यानंतर या प्रकरणावर वाद निर्माण झालाय.

Updated: Oct 3, 2014, 04:40 PM IST
दूरदर्शनवर सरसंघचालकांचं भाषण का दाखवलं गेलं? title=

नवी दिल्ली : आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमीनिमित्त केलेलं भाषण दूरदर्शनवर लाईव्ह प्रसारित करण्यात आलं. यानंतर या प्रकरणावर वाद निर्माण झालाय.

पहिल्यांदाच आज आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचं लाईव्ह भाषण दूरदर्शनवर दिसलं. यापूर्वी, कधीही कोणत्याही संघटनेचं भाषण दूरदर्शनवरून याप्रकारे लाईव्ह दाखवण्यात आलं नव्हतं. काँग्रेसच नाही तर एनडीए सरकारच्या कार्यकाळातही असे कार्यक्रम कधी लाईव्ह दाखवण्यात आले नव्हते.

यावर अनेकांनी आक्षेप व्यक्त केलाय. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी सोशल नेटवर्किंग साईट ट्विटरवरून हा प्रकार म्हणजे राज्याच्या मशीनरीचा दुरुपयोग असल्याचं म्हटलंय. ‘आरएसएस एक सांप्रदायिक हिंदू संघटना आहे. पुढच्या वेळी मस्जिद, इमाम आणि चर्चच्या पादरींचंही लाईव्ह दाखवण्याची मागणी होईल. कुणीतरी याविरुद्ध जनहित याचिका दाखल करेल अशी मी आशा करतो. याचा विरोध व्हायलाच हवा’ असंही त्यांनी म्हटलंय. 

काँग्रेसचे नेते रशिद अल्वी यांनी तर, ‘सरकारचे निर्णय आता दिल्लीतून नाही तर नागपूरमधून घेतले जात आहेत... देशाची राजधानी आता दिल्ली नाही तर नागपूर आहे’ अशी टीका केलीय.

यावर, ‘दूरदर्शन’च्या अर्चना दत्त यांनी हा कार्यक्रम एक बातमी म्हणून प्रसारित करण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलंय. यासाठी कोणतीही विशेष व्यवस्था करण्यात आली नव्हती. राज्यात निवडणुका कव्हर करण्यासाठी ‘डिटीजल सेटेलाईट न्यूज गॅदरिंग व्हॅन’ (DSNG) वापरण्यात येत आहेत. त्यापैंकी एक सरसंघचालकांच्या भाषणासाठी वापरण्यात आली.. असं स्पष्टीकरण दूरदर्शननं दिलंय.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.