जेव्हा राज ठाकरे रेल्वेनं प्रवास करतात...

हाती अनेक गाड्या आणि जिथं आज सगळे चॉपरनं प्रचारासाठी जातायेत, तिथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे चक्क रेल्वेनं गेले. हो आपल्या प्रचार दौऱ्यासाठी निघालेले राज ठाकरे अमरावतीला रेल्वेनं गेले होते. 

Updated: Oct 3, 2014, 04:26 PM IST
जेव्हा राज ठाकरे रेल्वेनं प्रवास करतात... title=

अमरावती: हाती अनेक गाड्या आणि जिथं आज सगळे चॉपरनं प्रचारासाठी जातायेत, तिथं मनसे अध्यक्ष राज ठाकरे चक्क रेल्वेनं गेले. हो आपल्या प्रचार दौऱ्यासाठी निघालेले राज ठाकरे अमरावतीला रेल्वेनं गेले होते. 

विदर्भाच्या दौऱ्यात राज ठाकरेंनी वर्धा, यवतमाळ, अमरावती इथं जाहीर सभा झाल्या. या सभेसाठी राज ठाकरे अमरावती एक्सप्रेसनं गेल्याचं दिसतंय.

राज ठाकरेंनी घटस्थापनेच्या दिवशी महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट जाहीर करून आपल्या प्रचाराला सुरूवात केली. त्यानंतर त्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत यंदा मनसेनं 231 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.