मुंबई : शिवसेनेने आपला वचननामा प्रसिद्ध केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज मातोश्री या निवासस्थानी पक्षाचा वचननामा जाहीर केला. यामध्ये मुंबईच्या वैभवात आणि समृद्धी भर टाकणारे प्रकल्प उभारण्याचे ठोस आश्वासन देण्यात  आले आहे.

पर्यटन  विकासाला प्राधान्य दिले जाईल. तीर्थक्षेत्रे, वन्य प्राण्यांचे अभयारण्य उभारण्यावर भर असणार आहे.  राज्यातील ७२० किमी लांबीच्या किनाऱ्याचा वापर करुन प्रवासी, माल वाहतूक, व्यापारी वाहतूक वाढविण्यावर भर राहील. छोट्या बंदरांचा विकास करणार त्याचबरोबर छोट्या जेट्टी उभारणार. खासगीकरणातून रो-रो सर्व्हिस पुरविण्यावर भर.  मेरीटाईम  बोर्डाने व मत्स्य व्यवसाय विकास विभागाने निवडलेल्या ४८ ठिकाणांचा विकास करणार. खासगी करणातून काही बंदराचा विकास करण्यात येईल, असे वचन उद्धव ठाकरे यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिलेय.

वचननाम्यातील ठळक बाबी :

आरोग्य : प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या संख्येत वाढ करणार. आरोग्य केद्रांमध्ये अत्याधुनिक सुविधा पुरविणार. स्वस्त औषधे पुरविण्यावर भर. जेनरिक औषधे उपलब्ध करुण देणार. आयुर्वेद व होमिओपॅथीसाठी प्राधान्य. विद्याशाखांना प्राधान्य. शासकीय आरोग्य योजनेच्या सुविधा. नागपूर येथे कर्करोगाचे अद्ययावत हॉस्पीटल उभारणार.

गुड गव्हर्नन्स व भ्रष्टाचार निर्मुलनाला प्राधान्य, सहकारच्या माध्यमातून विकासाला चालना. सरकारमधील भ्रष्टाचाराची चौकशी आणि पैसा परत मिळविण्याचे प्रयत्न. दोषींवर कारवाई. 

क्रीडा धोरण - सुशिक्षित बेरोजगार युवक आणि क्रीडापटूंना सुवर्णसंधी देणार. व्यावसायाभिमुख शिक्षण, ८० टक्के भूमिपुत्रांना नोकरीत स्थान.

आदिवासी पाड्यांचा पुनर्विकास करणार. विकलांगांसाठी निश्चित आणि चांगले धोरण.

 कामगारांना न्याय देणार. कामगार कायद्यातील जाचक अटी रद्द करणार. गिरणी कामगारांसाठी घरे देण्यासाठी नविन योजना.

हब सिटीज् - समार्ट सिटीज्

#  कोल्हापूर : राज्याचे अॅग्रीकल्चर हब म्हणून विशेष प्राधान्य. कृषी विद्यापीठ
- रंकाळा तलावाचे नुतणीकर आणि पंचगंगेचे शुद्धीकरण

# संभाजीनगर (औरंगाबाद) : पर्यटन हब म्हणून सर्वांगिण विकास
- स्मार्ट सिटी संकल्पनेतून सुधारित माहिती तंत्रज्ञान आणि ब्रॉडबॅण्ड सेवा
- खान नदी व नहरे अंबरीचे पुनरुज्जीवन
- हिलामय बागेचा कृषी उद्यान विकास
-शेन्द्रे, बिडकीन, बाळुज या औद्योगिक केंद्रांसह शहरासाठी एकात्मिक वाहतूक प्रणाली

# नागपूर : राज्याचे ट्रान्सस्पोर्ट हब म्हणून विकास
- मिहान सह निर्यात केंद्राचा विकास
- सिताबर्डी किल्ल्यासह मोकळ्या जागा, नाग नदी आणि तलावांचे सुशोभिकरण
- फळ प्रक्रिया केंद्रे

# अमरावती : राज्याचे अॅग्रीकल्चर हब म्हणून विशेष प्राधान्य.
- फळ प्रक्रिया केंद्रे

# नाशिक : राज्याचे रिजनल हब म्हणून प्राधान्य
- कृषी उद्योगाचे,अन्नप्रक्रियेचे व कृषीमाल निर्यातीचे केंद्र बनविणार
- गोदातील विकासाचा व कुंभमेळा व्यवस्थापनाचा महा आराखडा बनवून तयार करणार

# पुणे : राज्याचे शिक्षण हब म्हणून सर्वांगिण विकास
- मुळा-मूठा नद्यांचा जागतिक दर्जाची विकास योजना राबविणावर
- मेट्रो रेल्वेसह अत्याधुनिक वाहतूक प्रणाली
- स्मार्टसिटीच्या दर्जेदार सुविधा

# सोलापूर : राज्याचे टेक्सटाईल हब विकसित करणार
- सिद्धेश्वर तलाव आणि संभाजी तलावाचा पुनर्विकास
- भुईकोट किल्ल्याचे संवर्धन
- स्मार्टसिटीच्या अत्याधुनिक सुविधा

# रत्नागिरी / सिंधुदुर्ग : राज्याचे पर्यटन हब म्हणून सर्वांगिण विकास
- कृषी उद्योग आणि फळ प्रक्रिया केंद्रे उभारणार
- मत्स्य उद्योग व सागरी पर्यटनाला प्राधान्य 
- कृषीउद्योगाचे, अन्नप्रक्रियेचे व कृषीमाल निर्यातीचे महत्वाचे केंद्र बनविणार

वारकरी संप्रदाय

- वारकरी संप्रदायाला खूश करण्याचा प्रयत्न. संत विद्यापीठाची स्थापना करणार
- प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मुंबई आणि ठाण्याच्या धर्तीवर वारकरी भवन
- संत नामदेव यांचे राष्ट्रीय स्मारक पंजाब येथील घुमान येथे उभारण्याचा संकल्प

मुंबईसाठी काय?

- मुंबई डबेवाला यांच्यासाठी खास सुविधा
- पूर्व किनाऱ्याचा विकास तर पश्चिम किनाऱ्यावर जलवाहतूक
- मुंबईतील रेसकोर्स जागेत भव्य सार्वजनिक उद्यान
- सागरी मुक्त मार्ग (मरीन ड्राईव्ह ते कांदिवली) विकसित करणार
- दमणगंगा-गार्गी पिंजाळ हा नदीजोड प्रकल्प पूर्ण करणार
- विरार उन्नत रेल्वे आणि मेट्रो रेल्वेचे विस्तारीकरण
- ट्रान्स हार्बर लिंक-शिवडी ते न्हावाशेवा प्रकल्पात रेल्वे लाईन अंतर्भुत करून नविन स्वरुपात
- नवी मुंबई विमानतळ पूर्ण करणार

नगरविकास 

- शहर विकास नियंत्रण नियमावलीमध्ये किमान ५ वर्षे सातत्य ठेवणार
- ज्या विकास नियंत्रण नियमाखाली प्रकल्प मंजूर आहेत. त्याची नविन नियमावली. तरी जुन्याच नियमावलीनुसार प्रकल्पांना सर्व सवलती
- हेरिटेज कायद्याचे संपूर्णपणे पुनर्विलोकन करुन त्यातील जाचक अटी व शर्ती काढणून फक्त खरोखरी हेरिटेजच्या व्याख्येत मोडणाऱ्या पूर्ण परिसराचा समावेश न करता स्वतंत्र्य वास्तूंचा समावेश
- कोळीवाड्यांच्या विकासास प्राधान्य. नविन धोरण आखणार
- शहरातील नागरिकांना शुद्ध हवा मिळावी, यासाठी शहरांत हिरवीगार उद्याने योजना राबवणार

गृहनिर्माण धोरण

- एस. आर. ए. योजना पूर्ण राज्यात राबविण्याच्या दृष्टीने कायद्यात सुधारणा
- झोपडपट्टीधारक, म्हाडा पुनर्वविकसित लाभधारक (धारावी) तसेच क्लस्टर योजनेतील लाभधारक यांच्यासाठी योजना सुटसुटीत करणार
- सर्वसामान्यांना परवडणारी घरे बांधणार, नवे गृहनिर्माण धोरण तयार करणार

परिवहन

- महामार्गावरील अपघात लक्षात घेता ट्रामा सेंटर्स
-सात आसनी टॅक्सीना (६+१) परवाना
- विद्युत व्यवस्था, स्वच्छतागृह, उपहारगृह, संरक्षण कुंपण आदी व्यवस्था महामार्गावर

रस्ते

- मुंबई ते गोवा रस्त्याचे चौपदरीकरणाला प्राधान्य
- राज्यातील राष्ट्रीय महामार्ग सहापदरी टप्प्याटप्याने करणार
- एसटीची सेवा चांगली देण्यावर भर
- महामार्गावर प्रथमोपचार केंद्र, सुरक्षा व्यवस्था

जलवाहतूक

मुंबई (पूर्व व पश्चिम किनारा), नवी मुंबई तसेच कोकण विभागामध्ये जलवाहतुकीला प्राधान्य
- राज्यात सिटी पोर्ट प्रकल्प उभारणार. त्यामुळे चालक, वाहक यांना विश्रामाकरिनता व्यवस्था
- प्रवाशांकरिता उपहारगृहे, स्वच्छतागृहे व्यवस्थेला प्राधान्य

रेल्वे वाहतूक

- राज्यातील महत्वाच्या रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्र सरकारचा हिस्सा तात्काळ प्रदान करुन ते प्रकल्प सुरु करणार
- कोकण रेल्वे प्रकल्प जोडण्यावर भर. यात कऱ्हाड - चिपळूण, कोल्हापूर-वैभववाडी 
- पुणे - नाशिक तसेच मनमाड - इंदूर रेल्वेने जोडणार
-विदर्भातील वडसा-गडचिरोली, गडचांदूर - आदिलाबाद रेल्वेने जोडणार तसेच मराठवाड्यातील रखडेल्ल्या रेल्वे योजनांची अंमलबजावणी करणार

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Shiv Sena's manifesto published
News Source: 
Home Title: 

शिवसेनेचा वचननामा जाहीर

शिवसेनेचा वचननामा जाहीर
Yes
No