वानखेडेवर पोलीस फौजफाटा, CM शपथविधी सोहळ्याचं काऊंटडाऊन

महामुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं काऊंटडाऊन सुरु झाले आहे. वानखेडे स्टेडियमवर होणा-या सोहळ्याची विशेष तयारी पाहायला मिळतेय. वानखेडेवर या सोहळ्यासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर कडक सुरक्षेसाठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

Updated: Oct 31, 2014, 10:23 AM IST
वानखेडेवर पोलीस फौजफाटा, CM शपथविधी सोहळ्याचं काऊंटडाऊन title=

मुंबई : महामुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं काऊंटडाऊन सुरु झाले आहे. वानखेडे स्टेडियमवर होणा-या सोहळ्याची विशेष तयारी पाहायला मिळतेय. वानखेडेवर या सोहळ्यासाठी भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. त्याचबरोबर कडक सुरक्षेसाठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय.

मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. वानखेडेवर होणा-या या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधानांसह दिल्लीतील दिग्गज नेते, खेळाडू, कलाकार, उद्योगपती यांसह विविध मान्यवर हजर राहणार आहेत. त्यामुळं वानखेडेवर सुरक्षेची कडेकोट व्यवस्था करण्यात आलीय. 

आज होणा-या शपथविधीची तयारी आता अंतिम टपप्यात आलीये. शपथविधीसाठी वानखेडे स्टेडियमवर भव्य स्टेज उभारण्यात आलाय. महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि वैभवाची झलक या स्टेजवर पाहायला मिळणार आहे. आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियम मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यासाठी अनेक दिग्गज आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याने वानखेडे स्टेडियमवर कडेकोट बंदोबस्त आहे.

आजच्या शपथविधी सोहळ्याची कल्पना ही वाजपेयींच्या एका भाषणावर आधारित आहे. वाजपेयींनी एक भविष्यवाणी १९८० साली मुंबईमधल्याच अधिवेशनात केली होती. आज वाजपेयींची ही भविष्यवाणी खरी ठरणार आहे. वाजपयींच्या या स्वप्नावर आधारित आजचं सेलिब्रेशन असणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतल्या अरबी समुद्रात कमळ फुलणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.