बाळासाहेबांबद्दल आदर, शिवसेनेवर टीका करणार नाही- मोदी

बाळासाहेब ठाकरेंबद्दल मला खूप आदर आहे. त्यांना आदरांजली म्हणून मी त्यांनी बनवलेल्या शिवसेनेविरोधात एकही शब्द बोलणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत सांगितलंय. 

Updated: Oct 6, 2014, 12:05 PM IST
बाळासाहेबांबद्दल आदर, शिवसेनेवर टीका करणार नाही- मोदी title=

सांगली: बाळासाहेब ठाकरेंबद्दल मला खूप आदर आहे. त्यांना आदरांजली म्हणून मी त्यांनी बनवलेल्या शिवसेनेविरोधात एकही शब्द बोलणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेत सांगितलंय. 

बाळासाहेब यांच्या निधनानंतर पहिली निवडणूक आहे, शिवसेनेविरोधात मी एकही शब्द बोलणार नाही, ही माझी त्यांना आदरांजली आहे, असं मोदी म्हणाले. वृत्तपत्रातील लोकांनी राजकीय विचारातून बाहेर पडून आमच्या श्रद्धा-आदराबद्दल विचार करावा, असंही पंतप्रधान म्हणाले. काही वृत्तपत्रांमध्ये मोदींनी आपल्या कोणत्याही भाषणात शिवसेनेचा उल्लेख केला नाही, असं छापून आलंय. त्यावर बोलतांना मोदी हे म्हणाले. 

शिवसेना युती तुटल्यानंतर वारंवार भाजपवर टीका करत आहे. मात्र भाजपकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं जात नाहीय. 

सांगलीतल्य़ा सभेतील मोदींच्या भाषणातील मुद्दे- 

  • आबा पाटलांच्या सांगलीत मोदी

  • सांगलीत नरेंद्र मोदी, तर वर्धेला उद्धव ठाकरेंची सभा

  • बिरुबाच्या नावानं चांगभलं म्हणत मोदींनी केली भाषणाला सुरूवात

  • 'सेतुबंध' नावाचं पुस्तक खटावच्या वकीलसाहेबांवर लिहिलंय... 

  • सांगली सर्वात चांगली म्हणत मोदींनी केली मराठीतून सुरूवात

  • भिडे गुरूजींच्या आठवणी जागवल्या मोदींनी

  • भिडे गुरूजींच्या आठवणी जागवल्या मोदींनी... 

  • छत्रपती शिवरायांना नतमस्तक होऊन मागितला आशिर्वाद

  • नरेंद्र मोदींची शरद पवारांवर टीका... शिवाजी महाराजांवरून केलेल्या टीकेला प्रत्युत्तर... 

  • व्हिक्टोरिया टर्मिनलला शिवरायांचं नाव अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारनं दिलं... तुम्ही नाही...

  • सांगलीतील पाणीप्रश्न आणि वीजेच्या प्रश्नावरून मोदींची राज्य सरकारवर टीका...

  • शेतकरी आत्महत्या रोखण्यात पवारांना अपयश

  • मोदींचं टार्गेट शरद पवार

  • आमच्या शिवभक्तीला ललकारणं सोडून द्या... शरद पवारांवर टीका

  • बाळासाहेब ठाकरेंबद्दल मला खूप आदर आहे... त्यांना आदरांजली म्हणून मी त्यांनी बनवलेल्या शिवसेनेविरोधात बोलणार नाही...

  • बाळासाहेब यांच्या निधनानंतर पहिली निवडणूक आहे, शिवसेनेविरोधात मी एकही शब्द बोलणार नाही, ही माझी त्यांना आदरांजली आहे... वृत्तपत्रातील लोकांनी राजकीय विचारातून बाहेर पडून आमच्या श्रद्धा-आदराबद्दल म्हणावं...

  • काँग्रेस-राष्ट्रवादी एकाच गोत्राचे पक्ष

  • दोघांचं एकच काम आहे, ते भ्रष्टाचारवादी आहे... 

  • शेतकऱ्यांसाठी विविध योजना

  • अमेरिकेत जावून शेतकऱ्यांच्या फळांबद्दल माहिती घेतली... नवे प्रकल्प राबवणार

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.