ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - घनसावंगी

राष्ट्रवादी काँग्रेसचा जबरदस्त प्रभाव असलेल्या घनसावंगी मतदारसंघावर राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांची गेल्या 15 वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. टोपेंचा हा मजबूत गड नेस्तनाबूत करण्यासाठी यावेळी विरोधकांनी ताकत लावण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे या मतदार संघात होणाऱ्या लढतीकडे आतापासूनच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

Updated: Oct 8, 2014, 03:18 PM IST
 title=

जालना : राष्ट्रवादी काँग्रेसचा जबरदस्त प्रभाव असलेल्या घनसावंगी मतदारसंघावर राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांची गेल्या 15 वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. टोपेंचा हा मजबूत गड नेस्तनाबूत करण्यासाठी यावेळी विरोधकांनी ताकत लावण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे या मतदार संघात होणाऱ्या लढतीकडे आतापासूनच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - हिकमत उडाण
भाजप - विलास खरात
काँग्रेस - संजय पाटील
राष्ट्रवादी - राजेश टोपे
मनसे - सुनिल आर्दंड 

    
जालना जिल्ह्यातल्या 5 विधानसभा मतदार संघापैकी सर्वात महत्वाचा मतदार संघ म्हणून घनसावंगी मतदार संघाकडे पाहिलं जातं. कारण या मतदारसंघाचं नेतृत्व राज्याचे सध्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे करताहेत.

गेल्या 15 वर्षांपासून राजेश टोपे यांनी इथे कमालीचं संघटन कौशल्य दाखवत सत्ता टिकवलीये. सलग तीन वेळा या मतदार संघातून निवडून येत टोपेंनी इथे हॅटट्रिक साधली आहे. 

2009 च्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात टोपे यांची शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांशी लढत झाली. 

यात टोपेंना १ लाख ४ हजार २०६ मतं मिळाली. तर अर्जून खोतकरांना 80 हजार ८९९ मतांवर समाधान मानावं लागलं. 

या लढतीत टोपेंनी 23 हजार 307 मतांनी विजय मिळवला. विद्यमान आमदार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेल्या टोपेंनी गेल्या पाच वर्षात 
- गोदावरी नदीवर बंधारे
- पिण्याच्या पाण्याच्या योजना
- डिजिटल लायब्ररी
- ट्रामा केअर सेंटर
- पॉलिटेक्निक कॉलेज
अशी महत्वाची कामे केल्याचा दावा केलाय. 

राजेश टोपे भलेही काम केल्याचं सांगत असले तरी विरोधक त्यांचा विकासाचा दावा मान्य करायला तयार नाही.टोपेंनी कोणत्याच विकासाच्या योजना मतदार संघात राबवल्या नसल्याचं सांगत विरोधकांनी टोपेंच्या विकासाच्या दाव्यावर टीकास्त्र सोडलंय. 
 
राजेश टोपेंच्या या मतदार संघात सर्वसामान्यांना अनेक समस्यांनी वेढलंय.
- ग्रामीण भागात रस्त्यांची दूरवस्था
- मोसंबी बागा आहेत पण प्रक्रिया उद्योग नाहीत
- फळबागांसाठी सिंचनाच्या पुरेशा सोयी नाहीत
- सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या 
यामुळे सर्वसामान्य नागरिकांची नाराजी वाढत आहे.
 
एकूणच तीनवेळा बाजी मारल्याने राजेश टोपे यांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय. मात्र चौथ्यांदा विजयश्री मिळवायची असेल तर जनतेतली नाराजी दूर करण्याचं आव्हान त्यांच्यापुढे आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.