ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - इस्लामपूर

सांगली जिल्ह्यातला इस्लामपूर मतदारसंघ म्हणजेच पूर्वीचा वाळवा मतदारसंघ. राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचा हा मतदारसंघ. विरोधकांना नामोहरम करण्यात प्रत्येकवेळी जयंत पाटील यशस्वी ठरले आणि म्हणूनच सलग पाच विधानसभा निवडणुकांमध्ये ते या मतदारसंघातून विजयी पताका मिरवत आहेत. 

Updated: Oct 8, 2014, 05:18 PM IST
 title=

सांगली : सांगली जिल्ह्यातला इस्लामपूर मतदारसंघ म्हणजेच पूर्वीचा वाळवा मतदारसंघ. राज्याचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचा हा मतदारसंघ. विरोधकांना नामोहरम करण्यात प्रत्येकवेळी जयंत पाटील यशस्वी ठरले आणि म्हणूनच सलग पाच विधानसभा निवडणुकांमध्ये ते या मतदारसंघातून विजयी पताका मिरवत आहेत. 

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - भीमराव माने
काँग्रेस - जितेंद्र पाटील
राष्ट्रवादी - जयंत पाटील
मनसे - उदय पाटील
अपक्ष - नाना महाडिक (अपक्ष) 

क्रांतीकारकांचा तालुका अशी ओळख असणाऱ्या या तालुक्यात राजारामबापू पाटील यांनी सहकाराची बिजे रोवली. जयंत पाटलांच्या संघनटकौशल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा हा मजबूत बालेकिल्ला बनलाय. 
- साखर कारखाने,
- सहकारी दूध संघ,
- सहकारी बँक
- सहकारी वस्त्रोउद्दोग संकुल
- सोयाबीन प्रक्रिया प्रकल्प, 
- कासेगाव शिक्षण संस्था 

या माध्यमातून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा सर्वच माध्यमातून कार्यकर्त्यांचं एक भक्कम नेटवर्क तयार केलंय. कार्यकर्त्यांच्या बळावरच सलग पंधरा वर्षे अर्थमंत्री, गृहमंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री म्हणून आपण कार्यकर्तृवाचा ठसा उमटवू शकलो असं जयंत पाटील सांगताहेत.

- 262 कोटींचा निधी
- गावोगावी नळपाणी पुरवठा योजना,
- जलसिंचन योजना 
- राजारामबापू पाटील नाट्यगृह, 
- खुले नाट्यगृह, 
- अद्यावत प्रशासकीय इमारत,
- रस्ते, पूल, नदी काठी पुर संरक्षण भिंती,
- विना टोल पेठ - सांगली रस्त्याचे रुंदीकरण
आदी विकासकामे केल्याचं जयंत पाटील सांगतात

मात्र, सर्वसामान्यांसाठी आवश्यक अनेक सोयीसुविधांकडे जयंत पाटील दुर्लक्ष करतात असा आरोप केला जातो. 
- पेठनाका-सांगली रस्त्याचे रुंदीकरन गेली दहा वर्षांपासून अपूर्णच
- ग्रामीण-शहरी भागातील रस्त्यांची दूरवस्था
- मिरज तालुक्यातील्या क्षारफुटीच्या जमिनींचा प्रलंबित प्रश्न
- ऊसदराचा धगधगता प्रश्न 
- जलस्वराजच्या पाणी योजनेतील गैरप्रकारांकडे दुर्लक्ष 
- प्रशासनाचा मनमानी कारभार 

सर्वसामान्यांच्या समस्या वर्षानुवर्ष तशाच असल्याचं सांगत विरोधक नेमक्या याच प्रश्नांवर जयंत पाटील यांच्यावर कडाडून टीका करतात. महायुतीची एकजूट झाली तर यावेळी वेगळा करिष्मा घडू शकतो अशी चर्चा आता इथे सुरू झालीय. 

खासदार राजू शेट्टी यांनी ऊसदरावर आंदोलन छेडत दोनदा विजय मिळवला. एवढंच नाही तर जयंत पाटील यांच्या प्रभावाखालील या मतदारसंघातून तब्बल चौवीस हजारांचे मताधिक्य घेऊन 'राष्ट्रवादी'च्या या बालेकिल्ल्यालाच सुरुंग लावला! शेट्टीना मिळालेल्या माताधिक्याने विरोधी पक्षाच्या आशा पल्लवित होणं साहजिक आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.