ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पालघर

महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. एकाबाजूला विस्तिर्ण समुद्र किनारा तर दुस-या बाजूला डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगल अशी नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेला पालघर जिल्हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जातो.

Updated: Oct 8, 2014, 05:00 PM IST
 title=

पालघर : महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. एकाबाजूला विस्तिर्ण समुद्र किनारा तर दुस-या बाजूला डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगल अशी नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेला पालघर जिल्हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जातो.

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - कृष्णा घोडा
भाजप - दीपा संके / प्रेमचंद गोंड
काँग्रेस - राजेंद्र गावित
राष्ट्रवादी - महेश रावते
मनसे - जगन्नाथ वरठा
अपक्ष - मनिषा निमकर (बविआ)          

या जिल्ह्यातील सध्याच्या राजकीय बलाबलावर नजर टाकल्यास बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात दोन तर काँग्रेस,भाजप, सीपीएम आणि अपक्ष यांच्या ताब्यात प्रत्येकी एक-एक मतदारसंघ आहे. 

डहाणू विधानसभा मतदारसंघातून सीपीएमचे राजाराम ओझरे (16180) आमदार आहेत. तर विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व चिंतमन वणगा (5032) करत आहेत. पालघर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची सत्ता असून राजेंद्र गावीत (20971) हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. बोईसर विधानसभा मतदारसंघ बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात असून विलास तरे (13078) हे प्रतिनिधीत्व करत आहेत. 

नालासोपारा विधानसभा मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचेच क्षितीज ठाकुर (40782) हे आमदार आहेत तर वसई विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अपक्ष म्हणून निवडणूक लढलेले विवेक पंडीत (16798) हे करत असून त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला होता.

नवीन अस्तित्वात आलेला हा पालघर जिल्हा आगामी विधानसभा निवडणूकीत कोणाच्या बाजूने कौल देतो हे पाहणं औत्सूक्याचं ठरेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.