ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - कराड दक्षिण

सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघातून. गेली सात दशकं काँग्रेसची या मतदारसंघात सत्ता आहे. तर विलासकाका उंडाळकर तब्बल 35 वर्षे इथं आमदार म्हणून कार्यरत आहेत. 

Updated: Oct 8, 2014, 03:39 PM IST
 title=

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघातून. गेली सात दशकं काँग्रेसची या मतदारसंघात सत्ता आहे. तर विलासकाका उंडाळकर तब्बल 35 वर्षे इथं आमदार म्हणून कार्यरत आहेत. 

सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ. मतदारसंघाच्या पूनर्ररचनेत कराड शहर आणि दक्षिण कराडचा डोंगरीभाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला.

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - अजिंक्य पाटील
भाजप - अतुल भोसले
काँग्रेस - पृथ्वीराज चव्हाण
राष्ट्रवादी - राजेंद्र यादव
मनसे - विलास पवार
अपक्ष - विलासराव उंडाळकर (अपक्ष)

काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो. मतदारसंघाच्या पूनर्रचनेपूर्वी गेली सात दशकं या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसचे विलासकाका उंडाळकर पाटील हे ३५ वर्षांपासून या मतदारसंघातू आमदार म्हणून निवडून येत आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत विलासकाका उंडाळकर हे  १४ हजार ९१३ फरकाने विजयी झाले होते. गेल्या पाच वर्षात आमदारकीच्या माध्यमातून विलासकाकांनी विविध विकासकामे केल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय.
- गाव तेथे शाळा
- गाव तेथे दवाखाना
- गाव तेथे कुटिरउद्योग
- गाव तेथे शेतीपुरक व्यवसाय
- पाझर तलाव
ही काही प्रमुख कामे आमदारांनी केल्याचा दावा केला जातोय

विविध विकासकामे केल्याचा दावा भलेही सत्ताधा-यांकडून केला जात असला तरी या मतदारसंघातील काही प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत.
- विमानतळ विस्तारीकरणाचे काम रखडले
- पाझर तलावांचे काम निकृष्ठ दर्जाचे
- ऊसाला योग्य भाव नाही
- मूलभूत नागरी समस्या जैसे थे
- रोजगाराची समस्या कायम

कराड दक्षिण मतदारसंघात एकीकडं विकासकामांची ही परिस्थीती आहे तर दुसरीकडं राजकीय पटलावर हलचालींना वेग आला आहे. सात वेळा निवडून आलेले आमदार विलासकाका पाटील यांच्याऐवजी यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरलेत. त्यामुळे या मतदारसंघात विकासकामापेक्षा नेता कोण? या भोवतीच या मतदारसंघाचं राजकारण फिरणार आहे.

नुकतेच पार प़डलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे विरोधकांच्या आपेक्षा वाढल्या आहेत. विलासकाका उंडाळकर यांचा कारभार म्हणजे एकाधिकारशाहीचा असून काँग्रेसचा हा बालेकिल्ला महायुती उध्द्वस्त करेल असा दावा विरोधकांकडून केला जात आहे.

कारण नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत या मतदारसंघात काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराविरोधात अधिक मतदान झालं. त्याचा फायदा निश्चितच महायुतीच्या उमेदवारांना होईल असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष भरत पाटील यांनी व्यक्त केलाय.

संपूर्ण महाराष्ट्रात आगळंवेगळं राजकीय समिकरण म्हणून कराड दक्षिण मतदार संघाकडे पाहिले जाते. राष्ट्रवादीतून बाहेरपडून  कांग्रेसच्या हात हातात घेत अतुल भोसले यांनीही कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून जनमानसात आपली वेगळी ओळख निर्माण केलीय.  

सात वेळा विजयश्री खेचून आणलेल्या उंडाळकरांऐवजी मुख्यमंत्र्यांचं नाव पुढे करण्याचा काँग्रेस अंतर्गतविरोधकांचा डाव असल्याचं बोललं जातंय. तसेच विरोधांनी कंबर कसल्यामुळे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.