ऑडिट - बुलढाणा जिल्ह्याचं

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊचं जन्म स्थळ असलेलं सिंदखेडराजा, खाऱ्या पाण्यासाठी जगप्रसिद्ध असलेल लोणार सरोवर, विदर्भाची पंढरी श्रीसंत गजानन महाराज यांची संतनगरी शेगाव हि खर्या अर्थाने बुलढाणा जिल्ह्याची ओळख आहे. 

Updated: Oct 8, 2014, 01:53 PM IST
 title=

बुलडाणा : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊचं जन्म स्थळ असलेलं सिंदखेडराजा, खाऱ्या पाण्यासाठी जगप्रसिद्ध असलेल लोणार सरोवर, विदर्भाची पंढरी श्रीसंत गजानन महाराज यांची संतनगरी शेगाव हि खर्या अर्थाने बुलढाणा जिल्ह्याची ओळख आहे. 

राजकीयदृष्ट्या बोलायचं झालं तर बुलढाणा जिल्हा परिषदेवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. 

जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. बुलढाणा जिल्ह्याचं राजकीय बलाबल पाहता.

बुलढाणा जिल्ह्यात एकूण सात विधासभा मतदार संघ आहेत. त्यापैकी  भाजपकडे मलकापूर, जळगाव जामोद हे दोन मतदार संघ, बुलढाणा, मेहकर शिवसेनेकडे, तर खामगाव, चिखली कॉंग्रेसकडे आणि एकमेव सिंदखेडराजा मतदार संघ हा राष्ट्रवादी काँग्रेस कडे आहे. 

१) मलकापूरमध्ये भाजपचे आमदार चैनसुख संचेती ६१,१७७ मते मिळवून ११९८७ मताधिक्याने विजयी झालेत. 

2) जळगाव जामोदमध्ये भाजपच्या डॉक्टर संजय कुटे यांनी ४९,२२४ मते मिळवत 4 हजार 47 मतांच्या आघाडीने विजय मिळवला होता. 

3) बुलढाण्यामध्ये शिवसेनेचे आमदार विजयराज शिंदे विद्यमान आमदार आहेत. ६६,५२४ मते मिळवत त्यांनी ८४५६ मताधिक्याने पराभव केला होता. 

4) मेहकरमध्ये शिवसेनेचेच संजय रायमुलकर विद्यमान आमदार आहेत. ३३०९५ मतांच्या आघाडीने त्यांनी विजय मिळवला होता. 

5) खामगावमध्ये दिलीपकुमार सानंदा आमदार आहेत. ६४०५१मते मिळवत त्यांनी ७९२०ची आघाडी मिळवत त्यांनी काँग्रेसला विजय मिळवून दिला होता. 

6) चिखलीमध्ये आमदार राहुल बोंद्रे विद्यमान आमदार आहेत.  ७६,४६५ मते मिळवत त्यांनी २७९१६ मताधिक्क्याने विजयश्री खेचून आणली होती. 

7) सिंदखेडराजा इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे विद्यमान आमदार आहेत. ८१,८०८ मते मिळवत त्यांनी  २४१५० मतांच्या आघाडीने विजय मिळवला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.