ऑडिट पिंपरी : राष्ट्रवादीसाठी सुरक्षित मतदार संघ

राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वाधिक सुरक्षित असलेला मतदार संघ म्हणून पिंपरी मतदार संघाकडं पाहिलं जातंय. राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. कडवं आव्हान असलेला उमेदवार रिंगणात नसल्यानं बनसोडे यंदाही बाजी मारतील, असं चित्र दिसतंय.  

Updated: Oct 8, 2014, 11:00 AM IST

पिंपरी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वाधिक सुरक्षित असलेला मतदार संघ म्हणून पिंपरी मतदार संघाकडं पाहिलं जातंय. राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. कडवं आव्हान असलेला उमेदवार रिंगणात नसल्यानं बनसोडे यंदाही बाजी मारतील, असं चित्र दिसतंय.  
 
शहरातला सर्वात लहान आणि राखीव मतदार संघ. पुणे-मुंबई महामार्गाच्या आजूबाजूला एका सरळ रेषेत विभागलेला मतदार संघ. सर्वात महत्वाच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेससाठी सर्वाधिक सुरक्षित मतदार संघ म्हणून पिंपरी विधानसभा मतदार संघाकड पाहिलं जात. इथे पुन्हा राष्ट्रवादी कडून अण्णा बनसोडे यांनी मैदानात उडी घेतली आहे. 

गेल्या निवडणुकीत ६१,०६१ मत मिळवत अण्णा बनसोडे यांनी विजय मिळवला होत. भाजप च्या अमर साबळे यांनी त्यांना चांगली टक्कर देत ५१,५३४ मत मिळवली होती. तर अपक्ष चंद्रकांता सोनकांबळे यांना ११,१४६ मत मिळाली होती. केलेल्या कामांच्या जोरावर आता ही सहज विजय मिळवू असा दावा अण्णा बनसोडे करत आहे. 

काय केलीत विकासकामे...
- सांस्कृतिक भवन उभारणी 
- बुध्द विहार 
- पोलिसांसाठी व्यायामशाळा 
- पेविंग ब्लॉक बसवणे 
- ग्रंथालय उभारणी 

यापुढ ही मतदार संघाच्या विकासासाठी काम करू अस सांगत अण्णा बनसोडे यांनी विजयाची खात्री आहे. तर दूसरीकड विरोधकांनी मात्र अण्णा बनसोडे यांच्यावर जोरदार टीका केली. भाजप-आरपीआय युतीच्या उमेदवार चंद्रकांता सोनकांबळे यांनी बनसोडे यांची खिल्ली उडवली. एवढंच नाही तर आमदारांनी मतदार संघात एक ही मोठा प्रकल्प उभारला नाही. मागासवर्गीय दाखला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला नाही अनधिकृत बांधकाम प्रश्नावर मौन बाळगणे, मागासवर्गीयांच्या प्रश्नावर विधानसभेत एकदाही आवाज उठवला नाही, असे त्यांच्यावर आरोप आहेत. 
 
अण्णा बनसोडे यांना शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांचा ही मुकाबला करावा लागणार आहे. अखेरच्या क्षणी काँग्रेस सोडून सेनेत झालेल्या गौतम चाबुकस्वार यांनी विजयी होण्याचा दावा केलाय. कृण्णा बनसोडे यांना भाजपच्या अमर साबळे याचं कडव आव्हान होत. पण अखेरच्या क्षणी ही जागा आर पी आय ला सोडण्यात आली. त्यातच ए बी फॉर्म नसल्यामुळ चंद्रकांता सोनकांबळे यांना कमळ चिन्ह मिळालं नाही. त्यामुळ अण्णा बनसोडे यांच्यासाठी  झालेली निवडणूक एकदम सोपी झाल्याची चिन्ह आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.