व्हॅलेंटाईन डे विरोधात नागपुरात शिवसेनेचा राडा

धक्कादायक आणि संतापजनक बातमी नागपूरमधील. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या रस्त्यांवर आणि उद्यानांत  अक्षरशः धुडगूस घातला. व्हॅलंनटाईन डेच्या पूर्वसंध्येला बागेतल्या  आणि रस्त्यावरच्या जोडप्यांना त्रास दिला.

Updated: Feb 13, 2015, 11:21 PM IST
व्हॅलेंटाईन डे विरोधात नागपुरात शिवसेनेचा राडा title=

नागपूर : धक्कादायक आणि संतापजनक बातमी नागपूरमधील. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या रस्त्यांवर आणि उद्यानांत  अक्षरशः धुडगूस घातला. व्हॅलंनटाईन डेच्या पूर्वसंध्येला बागेतल्या  आणि रस्त्यावरच्या जोडप्यांना त्रास दिला.

व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर स्वयंघोषीत संस्कृती रक्षांनी पुन्हा एकदा धिंगाणा घातल्याचे दिसून आले. व्हॅलेंटाईन डेला विरोध करत, प्रेमी युगुलांना मारहाण करत त्यांना चक्क उठाबशा काढालयाला लावले. हा प्रकार नागपूरच्या बोटॅनिकल गार्डन, अंबाझरी गार्डन, पुटाला तलाव इथे दिसून आला.

धक्कादायक म्हणजे संस्कृती रक्षणाच्या नावाखाली भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या रस्त्यांवर आणि उद्यानांत  अक्षरशः धुडगूस घातला. व्हॅलंनटाईन डेच्या पूर्वसंध्येला बागेतल्या  आणि रस्त्यावरच्या जोडप्यांना त्रास दिला. त्यांचे फोटो काढत त्यांना उठाबशा काढायला लावल्या. इतकंच नाही तर काही कार्यकर्त्यांनी तर जय भवानीचा नारा देत बागेतल्या मुलींची छेड काढण्याचाही प्रयत्न केला.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.