नागपूर : देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव होण्याचा मान नागपूर जिल्ह्यातल्या पाचगावला मिळालाय.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेलं हे गाव डिजिटल इंडिया विकमध्येच हायटेक झालंय, हे विशेष...
महत्त्वाचं म्हणजे अवघी ५ हजार लोकवस्ती असलेल्या या गावात आजवर एकही सायबर कॅफे नव्हता. परिणामी ग्रामस्थांना १८ किलोमीटरवर असलेल्या नागपूरला धाव घ्यावी लागत होती.
मात्र, आता वाय-फायनं जोडलं गेल्यामुळे गावाला माहितीचं महाजाल खुलं झालंय. गावातले तरूण आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या योजनेचं भरभरून स्वागत केलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.