तरुणाची नग्न धिंड प्रकरणी १२ जणांना अटक

अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीत तालुक्यात तरूणाची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी १२ गावकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.  

Updated: Mar 14, 2015, 09:16 AM IST
तरुणाची नग्न धिंड प्रकरणी १२ जणांना अटक title=

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरीत तालुक्यात तरूणाची विवस्त्र धिंड काढल्याप्रकरणी १२ गावकऱ्यांना अटक करण्यात आली आहे.  

प्रेम संबंधाला झालेल्या विरोधातून संतप्त जमावाने तरुणाला बेदम मारहाण करत बाजारपेठेतून विवस्त्र धिंड काढल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी या गावात घडल्याचं शुक्रवारी उघडकीस आलं होतं.

या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून या घटनेच्या निषेधार्थ वांबोरी गावात अघोषित संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

संबंधित पीडित तरुणाचे गावातच राहत असलेल्या तरुणीशी प्रेम संबंध होते. मात्र या प्रेम संबंधाला विरोध करत गावातील संतप्त जमावाने तरुणाला तसेच त्याच्या नातेवाईकांना मारहाण केली. तरुणाचे कपडे फाडून त्याच्या गळ्यात चपलांचा हार घालून संपूर्ण गावातून विवस्त्र धिंड काढली. 

राहुरी पोलिसांना ही घटना कळताच घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत करण्यासाठी सौम्य लाठीमार केला. या घटनेमुळे वांबोरी गावात बंद पुकारण्यात आला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.