ठाणे : पोलिसांच्या क्राईम ब्रांचने घोड बंदर रोडवरील एका खासगी बंगल्यावर छापा टाकला. यात डझनभर मुला-मुलींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
पोलिस जेव्हा या बंगल्यावर पोहोचले तेव्हा 14 मुली आणि 15 मुलांकडून अश्लील कारनामे सुरू होते, हे दारूच्या नशेत होते.
पोलिसांना आधी ड्र्ग्सची पार्टी असल्याची शंका होती. अशा पार्टीला रेव पार्टीही म्हटलं जातं. बंगल्याची झाडाझडती करण्यात आली तेव्हा मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आणि कंडोम्स सापडले.
चौकशीनंतर पुढे आलंय कीय या ठिकाणी दक्षिण आफ्रिकेतील काही मुलं मुलीही बोलावण्यात आल्या होत्या.
कोणत्याही परवानगी शिवाय पार्टी करण्याच्या आरोपावरून मुंबई पोलिसांनी कलम 85(1) आणि (2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
हे सर्व मुलं मुली एकमेकांना ओळखत नव्हते, अटकेत असलेल्या तीन मुली हा दक्षिण आफ्रिकेतील मोरोक्कोच्या राहणाऱ्या आहेत.
मुंबई बाहेरीला लोणावळा, खंडाळामधील दुर्गम भागात अशा पार्ट्या नेहमी होत असतात.
काही दिवसांपूर्वी एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने अशी पार्टी दिली होती. यातही डझनभर मुलं मुली पकडण्यात आल्या होत्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.