राज्यात गणपती विसर्जनाला गालबोट 15 जणांचा बुडून मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यातील ८०१ गणेश मंडळांनी वाजत गाजत शांततेनं गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील चिखली इथं गणेश विसर्जनादरम्यान १७ वर्षीय सुनील शिंगाडे या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. 

Updated: Sep 28, 2015, 02:18 PM IST
राज्यात गणपती विसर्जनाला गालबोट 15 जणांचा बुडून मृत्यू title=

बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील ८०१ गणेश मंडळांनी वाजत गाजत शांततेनं गणपती बाप्पाचं विसर्जन केलं. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील चिखली इथं गणेश विसर्जनादरम्यान १७ वर्षीय सुनील शिंगाडे या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. 

आणखी वाचा - व्हिडिओ - लालबागच्या राजाच्या दरबारात पोलिसाकडून तरुणीला मारहाण

शहराजवळच असलेल्या सत्तूसेठ लढा यांच्या शेतामध्ये सैलानी नगर, जुने शहरातील काही गणेश मंडळांनी गणेश मूर्तीचं विसर्जन केलं. यावेळी सुनील हा आपल्या काही मित्रांसोबत त्याठिकाणी होता. रात्री ८ ते ९ दरम्यान तो विहिरीत पडला विहिरीला भरपूर पाणी असल्यामुळं रात्री बराच प्रयत्न करून देखील तो पाण्यात दिसून आला नाही. 

मात्र आज सकाळी गळ टाकून बघितलं असता त्याचा मृतदेह दिसून आला. त्याच्या मृत्युमुळं परिसरात शोककळा पसरली आहे. 

आणखी वाचा -  व्हिडिओ : गणपती विसर्जनादरम्यान हत्या कॅमेऱ्यात कैद

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.