काशिद समुद्रात 2 विद्यार्थी बुडून बेपत्ता

 रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेले पुण्यातील दोन विद्यार्थी बुडून बेपत्ता झाले आहेत. 

Updated: Nov 4, 2015, 02:34 PM IST
काशिद समुद्रात 2 विद्यार्थी बुडून बेपत्ता title=

रायगड :  रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेले पुण्यातील दोन विद्यार्थी बुडून बेपत्ता झाले आहेत. 

आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुण्यातील कोंढवा परिसरातील न्यू डॉन इंग्रजी माध्यम शाळेचे 58 विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह काशिद समुद्रकिनारी फिरायला आले आहेत. 

समुद्राच्या पाण्यात खेळत असताना मोठ्या लाटेबरोबर 2 विद्यार्थी खोल समुद्रात वाहून वाहून गेले व बेपत्ता झाले. तर बुडणार्‍या  एका शिक्षकाला स्थानिक स्पीडबोट चालकांनी वाचवले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.