औरंगाबादेत छेडछाडीला कंटाळून २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या

दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. औरंगाबादमध्ये छेडछाडीला कंटाळून २१ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केलीय. औरंगाबादच्या सिडको भागातील ही घटना आहे.

Updated: Aug 20, 2015, 07:48 PM IST
औरंगाबादेत छेडछाडीला कंटाळून २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद: औरंगाबादेत सततच्या छेडछाडीला कंटाळून श्रूती कुळकर्णी या २१ वर्षीय तरूणीनं झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केलीय. स्वप्निल मणियार नावाचा युवक तिला सतत त्रास देऊन लग्नासाठी मागे लागला होता. तसंच फोन कॉल आणि एसएमएस करूनही छळत असल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केलाय.

स्वप्निल मणियारविरोधात ३ ऑगस्टला विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्याला अटकही करण्यात आली होती. मात्र जामीन मिळाल्यानंतर स्वप्निल पुन्हा श्रूतीला त्रास देऊ लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. अखेर कंटाळलेल्या श्रू्रीनं सोमवारी आजी-आजोबांसाठी असलेल्या झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. 
रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्रुतीशी मृत्युशी झुंज गुरुवारी अपयशी ठरली. 

या प्रकरणात पोलिसांनी सहकार्य केलं नसल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केलाय. आरोपी स्वप्नीलला पोलिसांनी अटक केलीय. श्रूतीनं एक सुसाईड नोट लिहून ठेवलंय. 

आई, मला माफ कर... माझ्या चुकीमुळे तुला आणि सगळ्यांनाच खूप त्रास झाला...सॉरी...मला असं करायचं नव्हतं गं....पण खरं सांगते आई, त्या स्वप्नीलनं माझ्यासमोर काही ऑप्शनच ठेवला नाही....मला तुझं नाव खूप मोठं करायचं होतं गं...

हे पत्र लिहिणारी श्रूती कुलकर्णी आता या जगात नाही... सततच्या छेडछाडीला कंटाळून २१ वर्षांच्या श्रुतीनं आत्महत्या केलीय. स्वप्नील मणियार नावाचा तरुण कॉलेजमध्ये श्रुतीसोबत होता. याच स्वप्नीलनं तिची स्वप्नंच नव्हे, तर तिचं आयुष्यच उद्धवस्त केलं. श्रूतीनं कॉलेज बदललं तरी स्वप्नीलचा त्रास काही संपला नाही...काही दिवसांपूर्वीच स्वप्नीलच्या विरोधात धमकीची तक्रार सिडको पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली. पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला ३ ऑगस्टला अटक केली... पण लगेच त्याची जामीनावर सुटका झाली... जामीनावर सुटताच त्यानं पुन्हा श्रूतीला त्रास द्यायला सुरुवात केली. या जाचाला कंटाळूनच श्रूतीनं टोकाचं पाऊल उचललं.

पोलिसांनी सहकार्य केलं नसल्यामुळेच आपली बहीण जीवाला मुकल्याचा आरोप श्रूतीच्या बहिणीनं केलाय.  या सगळ्या प्रकारात पोलिसांची भूमिका वादग्रस्त ठरलीय. पोलीस मात्र सुसाईड नोटचा हवाला देत हात वर करतायत.

महाराष्ट्रात महिला सुरक्षित आहेत...असे ढोल सरकार बडवतं....पण राज्यात खरंच मुली आणि महिला सुरक्षित आहेत का? श्रुतीच्या आत्महत्येनं पोलिसांच्या कार्यक्षमेतवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.