डोंबिवलीत अतिरिक्त २५ टक्के पाणी कपात

 डोंबिवलीत अतिरिक्त पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आलाय. 

Updated: Mar 9, 2016, 08:20 PM IST
डोंबिवलीत अतिरिक्त २५ टक्के पाणी कपात  title=

डोंबिवली :  डोंबिवलीत अतिरिक्त पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आलाय. 

एमआयडीसीनं अतिरिक्त पाणी कपातीचा निर्णय़ घेतलाय. गुरूवार आणि शुक्रवार असे दोन दिवस डोंबिवलीकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागतो. 

मात्र आता इतर दिवसही डोंबिवलीत 25 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. याचा सर्वाधिक फटका 27 गावांना बसणार आहे. 

यामुळं डोंबिवलीत पाणी समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे.