ठाणेे : विवियाना मॉलमध्ये 4 युवकांनी दारू पिऊन एका दुकानामध्य़े सुरक्षा रक्षकासोबत हाणामारी केली. किरकोळ वादानंतर तुफान तोडफोड करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार जवळपास अर्धा तास विवियाना मॉल मध्ये सुरु होता. हजारो लोक या मॉलमध्ये असताना हा प्रकार घडला.
युवकांनी आपल्या मित्रांना फोन करून बोलावून घेतले. तुंबळ हाणामारी केली. या प्रकारामुळे मॉल मधील सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे. या आधी सुद्धा या मॉलमध्ये एका युवतीवर बलात्काराचा प्रकार घडला आहे. मॉलमध्ये वर्तक नगर पोलीस आल्यावर काही युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.