पुण्यातल्या 10 तर लातूरमधील 4 पालिकांसाठी मतदान सुरु

नगरपालिका निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातल्या 14 पालिकांसाठी आज मतदानाला सुरुवात झालीये. पुणे जिल्ह्यातल्या 10 तर लातूर जिल्ह्यातल्या 4 पालिकांसाठी हे मतदान होतंय. मतदानानंतर उद्याच मतमोजणी होणार आहे.

Updated: Dec 14, 2016, 09:20 AM IST
पुण्यातल्या 10 तर लातूरमधील 4 पालिकांसाठी मतदान सुरु title=

पुणे : नगरपालिका निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातल्या 14 पालिकांसाठी आज मतदानाला सुरुवात झालीये. पुणे जिल्ह्यातल्या 10 तर लातूर जिल्ह्यातल्या 4 पालिकांसाठी हे मतदान होतंय. मतदानानंतर उद्याच मतमोजणी होणार आहे.

पुणे या बालेकिल्ल्यात होणा-या दहा नगरपालिकांच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेससाठी अस्तीत्त्वाची लढाई असून पुण्यात पीछेहाट झाल्यास राष्ट्रवादीच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. दुसरीकडे पहिल्या टप्प्यातील विजयाची परंपरा कायम राखण्यासाठी भाजपनं सारा जोर पणाला लावलाय.