पुण्यात भीषण अपघात, ६ ठार

शहरात वडगाव पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे, या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. डांबर वाहतूक करणार्‍या ट्रकने गुरुवारी सकाळी ४ गाड्यांना चिरडलं, यात ६ ठार, तर २ गंभीर जखमी झाले. 

Updated: Jun 11, 2015, 04:59 PM IST
पुण्यात भीषण अपघात, ६ ठार title=

पुणे : शहरात वडगाव पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे, या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. डांबर वाहतूक करणार्‍या ट्रकने गुरुवारी सकाळी ४ गाड्यांना चिरडलं, यात ६ ठार, तर २ गंभीर जखमी झाले. 

भरधाव वेगात असलेल्या या ट्रकने चालकाचे गाडीवरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. डंपरचा वेग जास्त असल्यामुळे अनेक गाड्यांना त्याची धडक बसली. 

अपघातानंतर घटनास्थळी वाहनांची मोठी कोंडी झाली होती. दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.डंपरच्या धडकेत आसपासच्या इतर गाड्यांचंही मोठ नुकसान झालं आहे.  जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.