मुंबई : राज्यातील 25 जिल्ह्यांमधील 164 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 147 थेट नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांसाठी आज सरासरी 70 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.
सहारिया यांनी सांगितले की, राज्यात पहिल्या टप्प्यातील 147 नगरपरिषदा व 17 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान झाले. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सदस्य पदाच्या एकूण 3 हजार 705; तर थेट नगराध्यक्ष पदांच्या 147 जागांसाठी मतदारांनी मतदान केले. त्यासाठी 7 हजार 641 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. उद्या (ता. 28) सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीस सुरवात होईल. निकालानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल.
कोकण विभाग: पालघर (3)- 80, रायगड (9)- 88, रत्नागिरी (5)- 88 व सिंधुदुर्ग (4)- 67.
पुणे विभाग: सातारा (14)- 83, सांगली (8)- 84, सोलापूर (9)- 73 व कोल्हापूर (9)- 79.
नाशिक विभाग: नाशिक (6)- 79, धुळे (2)- 70, नंदुरबार (1)- 74, जळगाव (13)- 68 व अहमदनगर (8)- 83.
औरंगाबाद विभाग: जालना (4)- 59, परभणी (7)- 76, हिंगोली (3)- 68, बीड (6)- 74 व उस्मानाबाद (8)- 68.
अमरावती विभाग: अमरावती (9)- 72, अकोला (5)- 67, बुलडाणा (9)- 79, वाशीम (3)- 64, यवतमाळ (8)- 60.
नागपूर विभाग: वर्धा (6)- 60, चंद्रपूर (5)- 63.
एकूण सरासरी- (164)- 70.