मुंबई : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका नऊ महिन्याच्या लहानगीला आपला हात गमवावा लागणार आहे.
भिवंडीत राहणाऱ्या कैलाश म्हात्रे यांची नऊ महिन्यांची मुलगी सार्थिका हिला जुलाबाचा त्रास झाला, म्हणून भिवंडीतल्या खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं.
या हॉस्पीटलमधल्या डॉक्टरांनी तिला एकाच वेळी सलाईन आणि रक्त चढवलं... त्यामुळे तिचा हात सुन्न झाला.
त्यानंतर तिला दुसऱ्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथल्या उपचारांमुळे तिचा हात काळानिळा पडला.
त्यानंतर तिला पुन्हा एकदा ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात आणलं गेलं. तिथल्या डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन तिचा जीव वाचवला खरा... पण, गँगरीन झाल्या कारणानं सार्थिकाच्या जीवाच्या सुरक्षेसाठी आता तिचा हात कापावा लागणार आहे.